Chimbel Accident: चालकाचा अंदाज चुकला, अन् भलामोठा कंटेनर कलंडला; चिंबल उड्डाणपुलावर ट्रॅफिक जाम

Chimbel Truck Accident: सध्या कदंब पठाराकडून मेरशी सर्कलकडे येणारा एकाच बाजूचा उड्डाणपूल पूर्ण झाला असल्याने त्यावर येण्या-जाण्यासाठी तात्पुरता मार्ग करण्यात आला असला तर दुभाजक नाहीत.
Chimbel Truck  Accident
Chimbel AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिंबल येथील उड्डाणपुलावर काल मध्यरात्री कंटेनर उलटल्याने आज मंगळवारी सकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्‍यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांची तारांबळ उडाली. एकेरी वाहतूक करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्‍यान, उलटलेला कंटेनर रस्त्यावरून संध्याकाळपर्यंत हटवण्यात आला नव्हता. त्यामुळे दिवसभर ही कोंडी सुरू होती.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कंटेनर मेरशी सर्कलच्या दिशेने येत होता. चालकाला कदंब पठारवरून उड्डाणपुलावर येताना असलेल्या उतरणीचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण गेल्याने कंटेनर उलटला. रात्रीच्या वेळी वाहनांची गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Chimbel Truck  Accident
Chimbel Illegal Borewells: चिंबल येथे 60 ते 70 बेकायदेशीर कूपनलिका? जलसंपदामंत्र्यांनी दिले तपासणीचे आदेश

आतापर्यंत गेले आहेत अनेक बळी

उड्डाणपूल झाल्यापासून त्यावरून भरधाव वेगाने वाहने चालविली जातात. सध्या कदंब पठाराकडून मेरशी सर्कलकडे येणारा एकाच बाजूचा उड्डाणपूल पूर्ण झाला असल्याने त्यावर येण्या-जाण्यासाठी तात्पुरता मार्ग करण्यात आला असला तर दुभाजक नाहीत. कदंब पठारकाडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Chimbel Truck  Accident
Chimbel Kadamba Plateau: तळ्याजवळीलच जागा का हवी? ‘युनिटी मॉल’ला चिंबलवासीयांचा विरोध; आझाद मैदानावर ग्रामस्थ एकवटले

चिंबल-मेरशी जंक्शनवर गेल्या अनेक वर्षांत गंभीर अपघात झाले असून त्‍यात अनेकांचा बळी गेला आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षे रखडले होते. मात्र आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या पुलाच्या कामाला गती आली व गेल्या वर्षी एका बाजूने तो खुला करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com