Subhash Shirodkar on Illegal Borewells Chimbel
पणजी: चिंबल येथे ६० ते ७० बेकायदेशीर कूपनलिका असल्याच्या तक्रारी जलसंपदा विभागाला प्राप्त झाल्या असून त्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या बेकायदेशीर आढळल्यास संबंधितांना ५ लाख ते १० लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल, असे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
शुक्रवारी चिंबलमधील कूपनलिकांबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नोटीस जारी केली. जर कुणाला कूपनलिका बांधायची असेल, तर त्यांनी आवश्यक कायदेशीर परवानगी घेऊनच ती बांधावी. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
शहरातील लोकांनी नैसर्गिक जलस्रोत जपण्यावर भर द्यावा आणि नळाच्या पाण्याचा वापर कमी करून विहिरींचे पाणी सिंचन आणि इतर उपयोगांसाठी वापरावे, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी केले. आम्ही विहिरींचे पाणी पिण्यासाठी शुद्ध करून देतो. तसेच सामाजिक विहिरी स्वच्छ ठेवण्याची योजना जलसंपदा विभागाकडे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तिळारी प्रकल्पाचे पाणी पर्वरी येथे आणले असून तेच पाणी पणजीपर्यंत पोहोचवण्याचा विचार सुरू आहे. मांडवी नदीखालून जलवाहिनी टाकून हे पाणी राजधानीपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन असून हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.