Panaji News : पणजी, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या ग्राहक सुरक्षा समितीवर ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्या अमिता सलत्री यांची अध्यक्ष म्हणून अलीकडेच निवड करण्यात आली.
सलत्री यांनी ग्राहक सुरक्षा या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित केले. तुये येथील कार्यक्रमात ग्राहक हक्कांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
नवा ग्राहक हक्क कायदा-२०१९ विषयी जागृती करणारा पहिला कार्यक्रम साळगावकर कायदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. उत्तर जिल्हा ग्राहक कमिशनच्या सदस्य ॲड. रेजिता राजन यांना आमंत्रित करून त्या विषयाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
दुसरा कार्यक्रम कुजिरा येथील धेंपो महाविद्यालयात झाला. ‘ग्राहक साक्षरता महत्त्वाची’ या विषयावर गोवा कॅनचे संचालक रोलंड मार्टिन्स यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली.सलत्री यांनी ‘गॅस सेफ्टी’ या विषयावर तुये येथे पंचायतघरात स्वयंसाहाय्य गटातील महिलांना मार्गदर्शन केले.
हलक्या दर्जाचे साहित्य घातक
डिचोली येथील कामत गॅस सर्व्हिसचे अतुल कामत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गॅस शेगडी, रेग्युलेटर, रबर पाईप यांवर ‘आयएसआय’ मार्क असणे सक्तीचे आहे, असे त्यांनी सांगितले. गॅस सुरू असताना तिथे कोणत्याही कीटकनाशकाचा फवारा केल्यास स्फोट होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.