'जाहिरात माध्यमातून ग्राहकांची फसवणूक'

जनजागृती आवश्यक: ग्राहक शिक्षण व संशोधन केंद्राच्या प्रतिनिधींचे आवाहन
Consumer fraud through advertising
Consumer fraud through advertisingDainik Gomantak

सासष्टी: जाहिरात माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक केली जाते. अशा प्रकारच्या जाहिरातींविरुद्ध आवाज उठवणे, तक्रार करणे वगैरे कायदे सरकारने तयार केले आहेत. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, असे आवाहन अहमदाबाद येथील ग्राहक शिक्षण व संशोधन केंद्राच्या प्रतिनिधी अनुषा अय्यर व अनिंदिता मेहता यांनी केले.

गोवाकॅन, ग्राहक कल्याण सेलने आज बोर्डा येथील सरकारी महाविद्यालयात ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. गोव्यातील ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित केल्याचे गोवाकॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यानी पत्रकारांना सांगितले.

Consumer fraud through advertising
हळर्ण-पेडणे येथे गव्यांकडून भाजीपाला पीक उद्‌ध्वस्त

या परिसंवादात बोर्डा, काणकोण व केपे येथील सरकारी महाविद्यालय तसेच नावेली येथील रोझरी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अन्न व औषध प्रशासन खात्याने नव्याने भरती केलेले कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

गोव्याची लोकसंख्या १६ लाख असली तरी ८० लाखहून अधिक पर्यटक गोव्यात येतात. गोव्याबद्दल जाहिरातींद्वारे उलटसुलट माहिती पर्यटकांना दिली जाते व पर्यटक त्यास भुलतात. गोव्यातील हॉटेलवाले पर्यटकांना कसे लुबाडतात, याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. काही तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे; तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ सुरक्षितपणे लोकांना पुरवले जातील, याची खबरदारी घेण्यात येईल. तसेच लोकांना कायदे व नियमांची माहितीही दिली जाईल.

- रोलांड मार्टिन्स, गोवा कॅन निमंत्रक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com