वरुणापुरी मांगोरहिल चौकात वाहतूक बेट उभारणीच्या कामाला वेग

मान्यता मिळाल्यावर सदर वाहतूक बेट उभारण्यात येणार
वरुणापुरी मांगोरहिल चौकात वाहतूक बेट उभारणीच्या कामाला वेग
वरुणापुरी मांगोरहिल चौकात वाहतूक बेट उभारणीच्या कामाला वेगDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वरुणापुरी मांगोरहिल चौकामध्ये वाहतूक बेट उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वास्कोचे वाहतूक पोलीस निरीक्षक दीपेंद्र नाईक व गॅमन इंडियाचे प्रकल्प अधिकारी प्रभाकरन् यांनी रस्त्यांची पाहणी केली. तेथील वाहतूक बेटाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. मान्यता मिळाल्यावर सदर वाहतूक बेट उभारण्यात येईल.

वरुणापुरी मांगोरहिल चौकात वाहतूक बेट उभारणीच्या कामाला वेग
अज्ञातानं कचऱ्याला लावली लाग, अडीच लाखांचे नुकसान

या ठिकाणी, कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत, यासंबंधी नागरिकांनीही सूचना पाठविण्याची गरज आहे, असे नाईक यांनी सांगितले. दरम्यान, तेथे ट्रैफिक सिग्नल्स उभारण्याची गरज आहे. वरुणापुरी, मांगोरहिल, बायणाकिनारा उड्डाणपुल, सडा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने तेथे काही प्रमाणात वाहतूक वाढली आहे. येथे दिवसाकाठी एक हजारापेक्षा अधिक अवजड वाहनांची मुरगाव बंदरातून ये-जा चालू असते. लवकरच वेर्णामार्गे येणारी ती सर्व अवजड वाहने या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

वरुणापुरी चौकामध्ये वरुणपुरी वसाहत, केंद्रीय विद्यालयांकडे वाहनांची महामार्गावरून ये-जा चालू असते. महामार्गावरून मांगोरहिलकडे येणारी व महामार्गावर जाणारी वाहनेमोठ्या प्रमाणात असतात. त्यातच वरुणपुरी सडा महामार्ग सुरू झाल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करू लागली आहेत. त्यामुळे वरुणापुरी चौक हा 'अपघात प्रवण क्षेत्र झाल्याने तेथे वाहतूक बेट उभारण्याची गरज निर्माण झाली. तेथे वाहतूक बेट उभारण्यात यावे, यासाठी वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पत्रव्यवहार केला होता. तेथे लहान की मोठे वाहतूक बेट हवे, यासाठी तेथील वाहतुकीची पाहणी करण्यात येत आहे. यापाहणीनंतर वाहतूक बेटाच्या आकारासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले. तेथे वाहतूक बेटासह वाहतूक सिग्नल्सची गरज आहे. त्यासंबंधी निर्णय झालेला नाही. त्यामुळे तेथे वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज भासणार आहे. वाहतूक सिग्नल्स झाल्यास वाहतुकीमध्ये सुरळीतपणा येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी दाबोळी विमानतळ चौकात सिग्नल्स उभारण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात लहानमोठे अपघात होऊन काहीजणांना जीव गमवावे लागले होते. तेथे सिग्नल्स उभारण्यात आल्यावर तेथील वाहतुकीवर नियंत्रण आले होते. त्यामुळे वरुणापुरी चौकात सिग्नल्स उभारण्यासंबंधी त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com