Navelim News: रोझरी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला स्थानिकांचा विरोध

Rosary College: नावेली येथील रोझरी महाविद्यालय इमारतीच्या विस्ताराचा प्रस्ताव आहे. या इमारतीला विरोध वाढला आहे.

Rosary College Navelim:

रोझरी महाविद्यालय नवीन इमारतीच बांधणार आहे. हे बांधकाम पार्किंग जागेत करण्यात येणार आहे. इथे तळमजल्यासह दोन मजले बांधण्याचे नियोजन आहे. एरल प्रिंटो म्हणाले की, नावेलीत आधीच पार्किंगची समस्या आहे. येथे एक मैदान आहे. हे मैदान नेमके रोझरी हायस्कूलचे, उच्च माध्यमिकचे की महाविद्यालयाचे हेच मुळी कुणाला माहीत नाही. या पार्किंग जागेत इमारत उभारू नये, असे आम्हाला वाटते, असेही त्यांनी सांगितले.फाब्रिक समितीकडून असा प्रस्ताव पंचायतीकडे आला नसल्याचे स्पष्टीकरण सरपंच लुसिया कार्वालो यांनी दिले. जॉर्ज बार्रेटो यांनी सांगितले की हे महाविद्यालय नावेलीवासीयांसाठी असावे. नावेलीतीलच विद्यार्थी कुंकळ्ळी किंवा इतरत्र असलेल्या महाविद्यालयांमध्ये जातात. मग हा विस्तार कुणासाठी, असा प्रश्र्न त्यांनी केला. आम्ही कुठल्याही स्थितीत या महाविद्यालयीन इमारतीचा विस्तार करू देणार नाही, असेही बार्रेटो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

viresh borkar On RGP Internal Dispute
Anti defection law reform India
Mamura Fire Incident Video
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com