पेडणे येथे नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव 13 मार्च पासून

महोत्सव आयोजन समितीतर्फे कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर करण्यात आली.
Natvarya Prabhakar Panashikar Memorial Festival at Pernem from 13th March
Natvarya Prabhakar Panashikar Memorial Festival at Pernem from 13th MarchDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव ता.13 मार्च रोजी पेडणे येथील श्री भगवती देवस्थान प्रांगणात होणार असून महोत्सव आयोजन समितीतर्फे कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर करण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकर,उपाध्यक्ष केशव पणशीकर,राजेंद्र बोंद्रे,आनंद नाईक,अध्यक्ष,पेडणे प्रभाग गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष प्रवीण कोटकर व उपाध्यक्ष केशव पणशीकर म्हणाले ,नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सवाचे रविवारी 6 वाजता पं.प्रसाद सावकार (ज्येष्ठ नाट्यकर्मी), पं . रघुनंदन पणशीकर (ज्येष्ठ शास्त्रीय गायक) डॉ . अजय वैद्य (ज्येष्ठ रंगकर्मी) प्रा . अनिल सामंत ( अध्यक्ष , गोवा मराठी अकादमी ) उषा नागवेकर ( नगराध्यक्षा,पेडणे) विनोद सावळ देसाई (उपाध्यक्ष, श्री भगवती देवस्थान ) यांच्या उपस्थितीत होईल.

Natvarya Prabhakar Panashikar Memorial Festival at Pernem from 13th March
भाटले-पणजी येथील सटी भवानीची आज पालखी

नाट्यकर्मी सर्वश्री चंद्रकांत कोटकर , आनंद चणेकर , विठ्ठल परब , आत्माराम म्हामल , सुरेश बांदेकर , विलास परब आणि श्रीमती भानुमती मालपेकर यांचा सायंकाळी 7 वा. मान्यवरांचा सत्कार होईल. सलाम नटवर्यास हा नाट्यप्रवेश , नाट्यसंगीत , स्वगत , आठवणी आणि किस्से यांचा कार्यक्रम होणार आहे. यात अशोक समेळ, विघ्नेश जोशी, जान्हवी, रघुनंदन पणशीकर, क्षमा वैद्य, सुचेता अवचट, प्रतिभा कुलकर्णी , चित्रा साठे, स्नेहा परांजपे, कल्याणी जोशी , शिल्पा कोयंडे, चारुदत्त आफळे आणि रोहिदास परब यांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com