Goa Shack Policy: शॅकच्या जागांचे सीमांकन लवकर करा : व्यावसायिकांची मागणी

Goa Shack Policy: उत्तर गोव्यातील शॅकमालकांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या सोडतीद्वारे 255, तर दक्षिण गोव्यातून 98 शॅकचे वाटप करण्यात आले.
Goa Shack Policy
Goa Shack PolicyDainik Gomantak

Goa Shack Policy: दिवाळीपूर्वी शॅक उभारून व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी पर्यटन विभागाने तातडीने शॅक उभारण्यात येणाऱ्या भागाचे सीमांकन करावे, अशी मागणी शॅकमालक संघटनेने केली आहे.

उत्तर गोव्यातील शॅकमालकांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या सोडतीद्वारे 255, तर दक्षिण गोव्यातून 98 शॅकचे वाटप करण्यात आले.

Goa Shack Policy
54th IFFI: ‘भाईजान’च्या उपस्थितीत होणार ‘इफ्फी’चे उद््घाटन

उपलब्ध माहितीनुसार, शॅकसाठी उत्तर गोव्यातून 1,400 आणि दक्षिण गोव्यातून 203 अर्ज पर्यटन विभागाकडे प्राप्त झाले होते. पैकी उत्तर गोव्यात 255, तर दक्षिण गोव्यात 98 शॅक्सचे वाटप करण्यात आले.

शॅकवाटप सोडतीत भाग घेण्यासाठी उत्तर गोव्यातील 11 गावांतील शेकडो शॅकमालक मंगळवारी सकाळी पणजी येथील पर्यटन भवनाबाहेर जमले होते.

सोडतीची सुरुवात सकाळी 10 वाजता गावनिहाय व प्रवर्गनिहाय झाली. सोडतीची वेळ सकाळी 9.30 ची देण्यात आली होती. मात्र, काही अडचणींमुळे काऊंटरबाहेर कागदपत्र पडताळणी सकाळी 10 वाजता सुरू झाली.

प्रथम कळंगुट, मग कांदोळी, केरी, हरमल, मांद्रे, मोरजी, वझरांत, हणजूण, वागातोर, शिरदोन, शापोरा या क्रमाने शॅकवाटप सोडतीची प्रक्रिया झाली. मात्र, कांदोळीत चार शॅक्ससाठी अर्जच आले नाहीत.

Goa Shack Policy
Goa Shack News: परवाने मिळाले, तरीही अडथळे

तीन श्रेणीत सोडत

सोडतीसाठी तीन श्रेणी होत्या, ज्यामध्ये पहिली श्रेणी पाच वर्षे आणि त्यापेक्षा जास्त अनुभवी, दुसरी श्रेणी 1 ते 4 वर्षे अनुभवी आणि तिसरी श्रेणी अनुभव नसलेल्या अर्जदारांसाठी होती.

आता पर्यटन विभागाने तत्काळ ज्या भागात शॅक्सचे वाटप केले आहे, त्यांचे सीमांकन करावे, जेणेकरून दिवाळीपूर्वी शॅक्स उभारून व्यवसाय सुरू करू शकू, असे गोवा पारंपरिक शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल कुलासो म्हणाले.

वेळसांवसाठी एकही अर्ज नाही

दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवरील शॅक्सचे वाटप आज माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारतीमध्ये झाले. सोडत पद्धतीने 98 शॅक्स वितरीत केले, अशी माहिती पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज वागळे यांनी दिली.

फात्राडे किनाऱ्यावर पाच, तर झालोर किनाऱ्यावर केवळ एक शॅक देण्यात आला आहे. मात्र, यंदा वेळसांव किनाऱ्यासाठी एकही अर्ज आला नसल्याची माहिती वागळे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com