कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दिल्लीत; चर्चांना उधाण

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना कॉंग्रेस हायकमांडकडून दिल्लीत बोलावण्यात आले आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak

गोवा कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घुमत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले गेले ते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावर कॉंग्रेसतर्फे पक्षाविरोधी कारवाई केल्याबद्दल आपत्रात याचिका दाखल करण्यात आली.

Amit Patkar
भाजप सरकारकडून गोव्याचे नाव बदनाम आणि कुंकळ्ळीकरांचा अपमान : युरी आलेमाव

त्यानंतर कॉंग्रेसचे बंड शमले. अद्याप कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेते अजून ठरलेला नाही. यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसपूस समोर आली आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना कॉंग्रेस हायकमांडकडून दिल्लीत बोलावण्यात आले आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कुंकळ्ळी लढ्याच्या स्मरणदिनाची निमंत्रणपत्रिकांच्या केवळ छायाप्रतींचे वाटप करून गोव्याला बदनाम केले असून, निमंत्रण पत्रिकेत आमदारांचा तसेच नगराध्यक्षांचा उल्लेख न करून कुंकळ्ळीकरांचा अपमान केला आहे अशी घणाघाती टिका कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com