Goa Congress: ..हा तर गोवावासीयांना जमीन खरेदीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न! दरवाढीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र

South Goa Congress: सासष्‍टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीन तालुक्‍यांसाठी जमिनीचे सरकारमान्‍य दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्‍याने लोकांमध्‍ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या दोन्‍ही तालुक्‍यात जमीन खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारणीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीच्या दरांमध्ये अन्यायकारक वाढ केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका केली.

South Goa Congress District CommitteeDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa Congress District Committee About Land Rates

मडगाव: सासष्‍टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीन तालुक्‍यांसाठी जमिनीचे सरकारमान्‍य दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्‍याने लोकांमध्‍ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या दोन्‍ही तालुक्‍यात जमीन खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारणीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीच्या दरांमध्ये अन्यायकारक वाढ केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका करताना, ही अधिसूचना म्हणजे गोवावासीयांना जमीन खरेदीपासून दूर ठेवण्याचा थेट प्रयत्न असल्याचा आरोप केला. ही दरवाढ लागू करण्‍याची अधिसूचना येत्‍या १५ दिवसांत मागे घेतली नाही, तर लोकांना रस्‍त्‍यावर येणे भाग पडेल असे यावेळी सांगण्‍यात आले.

काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्‍हा अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांच्‍यासह मोरेन रिबेलो आणि सावियो कुतिन्‍हो यांनी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत सरकारवर टीका करताना, सरकार राज्याबाहेरील लोकांना गोव्यातील जमीन खरेदी करणे अधिक सोयीस्कर बनवत आहे आणि अशाप्रकारे गोव्यातील जमीन बिल्डर लॉबीच्‍या ताब्यात देऊन गोव्याचा सर्वनाश करू पाहात आहे असा आरोप केला.

सरकारने ही जमिनीचे दर वाढविणारी अधिसूचना त्‍वरित रद्द करावी, अशी मागणी कुतिन्‍हो यांनी यावेळी केली.

South Goa Congress: सासष्‍टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीन तालुक्‍यांसाठी जमिनीचे सरकारमान्‍य दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्‍याने लोकांमध्‍ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या दोन्‍ही तालुक्‍यात जमीन खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारणीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीच्या दरांमध्ये अन्यायकारक वाढ केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका केली.
Cash For Job प्रकरणातील तिघीही अटकेत! आत्‍महत्‍या प्रकरणी पूजावर गुन्‍हा; आणखी एक नवी तक्रार दाखल

सामान्यांना घर बांधणे अशक्य

कुतिन्‍हो म्हणाले की, सरकारने जमिनीचे वर्गीकरण शहरी, विकसनशील, ग्रामीण आणि किनारपट्टी भाग अशा स्‍वरूपात केले आहे. पणजी शहरात ही दरवाढ तब्बल ३०० ते ६०० टक्‍के आहे. सासष्टीत मडगाव व कुंकळ्‍ळी परिसरात ही दरवाढ १०० ते २३० टक्‍के झालेली आहे. वास्को नगरपालिका क्षेत्रात ३७५ ते ७०० टक्‍के दरवाढ सूचित केली आहे. नावेली व दवर्ली येथे ८० टक्‍के दरवाढ दाखविण्‍यात आली आहे, तर आकेसारख्‍या भागात ही दरवाढ ३०० टक्‍के आहे. हे जमिनीचे भाव पाहिल्‍यास त्‍यावर मुद्रांक शुल्‍क भरून सामान्‍य गोवेकरांना घर बांधणे शक्‍यच होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com