Cash For Job प्रकरणातील तिघीही अटकेत! आत्‍महत्‍या प्रकरणी पूजावर गुन्‍हा; आणखी एक नवी तक्रार दाखल

Goa Cash For Job Scam: नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत, प्रिया यादव, पूजा नाईक या तिघीही सध्‍या पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत. आज दीपश्रीला अटक करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे या तिघींनीही मधाळ वाणी आणि सौंदर्याने अनेकांची ‘शिकार’ केली.
Goa Cash For Job Scam: नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत, प्रिया यादव, पूजा नाईक या तिघीही सध्‍या पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत. आज दीपश्रीला अटक करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे या तिघींनीही मधाळ वाणी आणि सौंदर्याने अनेकांची ‘शिकार’ केली.
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cash For Job Scam

फोंडा/डिचोली: नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत, प्रिया यादव, पूजा नाईक या तिघीही सध्‍या पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत. आज दीपश्रीला अटक करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे या तिघींनीही मधाळ वाणी आणि सौंदर्याने अनेकांची ‘शिकार’ केली. सतरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजाविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.

उसगावातील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ लाखांना फसवल्याप्रकरणी सागर नाईक, सुनीता पावसकर यांच्‍यानंतर आज सोमवारी या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ दीपश्री सावंत गावस ऊर्फ दीपश्री प्रशांत म्हातो हिला फोंडा पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणाशी संबंधित टोनीनगर-सावर्डे येथील सदानंद विठू विर्नोडकर यांनीही फोंडा पोलिसांत सागर नाईक याच्याविरोधात नोकरी देण्याच्या बहाण्याने १० लाख रुपयांना फसवल्याची तक्रार नोंद केली आहे. फोंडा पोलिसांनी सदानंद विर्नोडकर यांची तक्रार दाखल करून घेतली असून पहिल्या प्रकरणातून जामिनावर सुटलेला संशयित सागर सुरेश नाईक (कुर्टी) याला आज दुसऱ्यांदा अटक केली. पोलिस चौकशीत सागरने या प्रकरणातही दीपश्रीचा हात असल्याचे सांगितल्याने आणखी अशी कितीतरी प्रकरणे असतील, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

राज्यात नोकरीच्या बदल्यात पैसे घेऊन कोणाची फसवणूक झाली असेल, मग ती कोणीही केलेली असल्यास त्या प्रकरणी पोलिसांत तक्रार द्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पूजा नाईक हिला पहिल्यांदा पकडले तेव्हा पैसे परत मिळाल्याने तीन तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी नोकरीच्या बदल्यात पैसे घेतलेली कोणतीही व्यक्ती कारवाईपासून सुटणार नाही.

सतरकर मृत्यू प्रकरणामुळे पूजाचा पाय आणखी खोलात

पूजा नाईक हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा म्हार्दोळ पोलिसांनी दाखल केला आहे. २ नोव्हेंबरला कुंकळ्ये येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या दिवंगत श्रीधर सतरकर याची पत्नी श्रुती सतरकर हिने या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, लोकांकडून पैसे आणण्यासाठी पूजा सतत सतरकर याच्‍यावर दबाव आणत होती. पूजाने त्‍याला आपली दुचाकीही वापरण्यास दिली होती. तिच्‍या सांगण्यावरून सतरकरने अनेकांकडून पैसे घेऊन ते पूजाकडे दिले होते. मात्र नोकरीही नाही आणि पैसेही नाहीत असा प्रकार झाल्यामुळे सतरकर वैफल्यग्रस्त बनला होता. लोकांना काय उत्तर द्यायचे या चिंतेतूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप श्रुती सतरकर हिने केला आहे. सध्या पूजा डिचोली पोलिसांच्या ताब्यात आहे.

दीपश्री आली होती पोलिसांना शरण येण्‍यासाठी

दीपश्री सावंत हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी तिच्‍या तिवरे-माशेल येथील फ्लॅटवर धडक दिली असता ती गायब असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर फोंडा पोलिसांनी तिच्‍याविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली होती. दीपश्रीच्या फोनचे लोकेशन बेळगावला सापडत असल्याने पोलिसांनी तेथेही शोध केला होता, मात्र आज सोमवारी पोलिसांना शरण येण्यासाठी फोंड्यात आली असता दीपश्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले व रीतसर अटकही केली.

आमदाराच्‍या मदतीने प्रियाने मिळविली होती नोकरी

प्रिया यादव हिचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. २००८ मध्ये तिने एका आमदाराला हाताशी धरून हस्तोद्योग महामंडळात नोकरी मिळविली होती. त्यासाठी तिने सर्व कागदपत्रे बनावट दिली होती. तिचा हा बनाव उघड झाल्यानंतर तिला नोकरी सोडावी लागली होती. त्यानंतरही तिच्या अशा कारवाया सुरूच राहिल्‍या. बोलण्यात ती अतिशय चतुर आहे.

Goa Cash For Job Scam: नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत, प्रिया यादव, पूजा नाईक या तिघीही सध्‍या पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत. आज दीपश्रीला अटक करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे या तिघींनीही मधाळ वाणी आणि सौंदर्याने अनेकांची ‘शिकार’ केली.
Goa Crime: अवेडे केप्यात दोन गटात तुंबळ हाणामारी; आत्मघाती हल्ल्यात तिघे जखमी

२७ लाखांचा ऐवज जप्त

१. रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या प्रिया यादव हिच्‍याकडून डिचोली पोलिसांनी दोन मोटारगाड्या, दोन स्कूटर, तिच्‍या स्‍वत:च्‍या मालकीची चार वाहने आणि ११६ ग्रॅम सोने मिळून २७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

२.न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रिया अजय यादव या महिलेने डिचोलीत अनेकांना एक कोटीहून अधिक रुपयांचा चुना लावण्याचे प्रकार घडले असले तरी लक्ष्मी दलवाई या महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तिला अटक केली आहे.

३.लक्ष्मी दलवाई हिच्या दोन मुलांना रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून प्रिया आणि पोलिस कॉन्स्टेबल रोहन व्‍हेंझी याने दलवाई हिच्याकडून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने २०.७० लाख रुपये उकळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com