Yuri Alemao : राहुल गांधींचे भारतमातेशी रक्ताचे नाते; युरींनी ठणकावलं

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राहुल गांधी यांचे महात्मा गांधींशी रक्ताचे नाते नाही, असे वक्तव्य केले होते. त्याला काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao : भारतासाठी रक्त सांडणाऱ्या महात्मा गांधींशी आमचे नेते राहुल गांधी यांचे रक्ताचे नाते आहे. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनीही देशासाठी आपले रक्त सांडले. भारतीय मातीत राहुलचे वडील राजीव गांधींच्या निर्घृण हत्येने रक्त सांडले आहे. ज्यांची निर्घृण हत्या झाली. राहुल गांधी यांचे भारत मातेशी रक्ताचे नाते आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे राहुल गांधी यांचे महात्मा गांधींशी रक्ताचे नाते नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष, ज्यांनी भारतासाठी आपले रक्त सांडले, त्या महात्मा गांधींच्या विचारसरणीवर चालत असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आमचे नेते राहुल गांधी बंधुता आणि सर्वसमावेशक भारताचा संदेश देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करतात. आपले वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सूडाची भावना न ठेवता राहुल गांधी महात्माजींच्या करुणेचा मार्ग स्वीकारतात, असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao
Francisco Sardinha: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवावी; काँग्रेस खासदार सार्दिन असं का म्हणाले?

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी अथक परिश्रम घेतले. देशसेवा करताना त्यानी गोळ्यांचा सामना केला. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागपूर पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीचा निकाल पाहावा, असे सांगून, काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदाच्या 13 पैकी 9 तर उपाध्यक्ष पदाच्या 13 पैकी 8 जागा जिंकल्या. भारतातील भाजप राजवटीच्या अंताची ही सुरुवात आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरपासून याची सुरुवात झाली आहे. राहुल गांधींच्या "भारत जोडो यात्रेचे" परिणाम दिसून येत आहेत असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या मानवतावादी मूल्यांचे अनुयायी आहेत आणि आम्ही विविध संस्कृती आणि जीवनशैलींचा आदर करतो. आम्हाला प्रत्येक धर्माचा आदर करायला आणि जातीय सलोखा पसरवायला शिकवलं जातं. विविधतेतील एकतेवर आमचा विश्वास आहे आणि तिचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com