देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. यातच गोवा विधानसभा निवडणूकीची (Goa Assembly Election) तयारीही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर गोवा भाजपचे प्रभारी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गोव्यामध्ये बोलत असताना कॉंग्रेससह तृणमुल कॉंग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पक्षावर हल्ला चढवला.
फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस (Goa Congress) हा पार्टटाईम पक्ष बनला आहे. गोवा स्वाभीमानी आहे. गोव्यातील मतदार आम आदमी पक्षाच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. रोहण खवंटे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्याची विधानसभा निवडणूक तर आपण जिंकणार आहोत.
दरम्यान, रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी पक्ष प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. "पर्वरी मतदारसंघात मागील दहा वर्ष मी अपक्ष आदार म्हणून निवडून आलो ते फक्त तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच. अडीच वर्षे मंत्री असताना गोवेकरांसाठी काम केले. एक सुध्दा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून कष्टाची किंमत काय असते हे मला चांगले माहीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.