रोहन खंवटे यांचा अखेर भाजपात प्रवेश

गोव्याचे अपक्ष उमेदवार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज भाजपत प्रवेश केला आहे
Porvorim MLA Rohan Khaunte joins BJP 

Porvorim MLA Rohan Khaunte joins BJP 

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa: गोव्याचे अपक्ष उमेदवार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज भाजपात (Goa BJP) प्रवेश केला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र अनेक जणांचे म्हणणे होते की रोहन खंवटे हे भाजपात जातील. आणि आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant),भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे (Sadanand Sheth Tanawade) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पार पडला.(Porvorim MLA Rohan Khaunte joins BJP )

आमदार रोहन खंवटे यांनी पक्ष प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, "पर्वरी मतदारसंघात मागील दहा वर्ष मी अपक्ष मतदार म्हणून निवडून आलो ते फक्त तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच. या दहा वर्षातील साडे सात वर्षे मी विरुद्ध पक्षात राहिलो; आणि अडीच वर्ष आम्ही सरकार स्थापन केलं. अडीच वर्षे मंत्री असताना गोवेकरांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि केल्या. मी सुद्धा एक मध्यमवर्गीय कुटुंबातला असून कष्टाची किंमत काय असते, हे मला चांगले माहीत आहे. कष्टकरी कुटुंबाची परिस्थिती, त्या कुटुंबाला काय आवश्यक आहे, याची जाणीव मला आहे. आणि हे फक्त बोलून न दाखवता गेली दहा वर्षे आणि करत आलोय. आता प्रश्न फक्त जिंकण्याचा आहे. पार्टी कोणतीही असेल फक्त महत्त्वाचं एवढच आहे की गोव्यातील जनतेचा विकास साधणं."

यानंतर नकळतपणे त्यांनी टीएमसी (TMC) वर निशाणा देखील साधला. ते म्हणाले, "एक पार्टी गोव्यात येते आणि गोव्यात खेळ चाललाय असे म्हणते. पण मी सांगतो, इथे प्रत्येकजण स्वाभिमानी आहेत, त्यामुळे आता आपण गोवेकर कुणाच्याशी हातातलं खेळणं बणून राहायचं नाही. आता फक्त आपण जिंकायचं."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com