Goa Congress: लोकसभा उमेदवार घोषणेनंतर गोवा काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; भिके, सार्दिन नाराज

Goa Congress: आगामी लोकसभेसाठी उमेदवार घोषणेनंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress

काँग्रेसने राजकीय निद्रावस्थेतून बाहेर येत अखेर उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे सरचिटणीस (राजकीय) के. सी. वेणुगोपाल यांच्यासमक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही उमेदवारीची घोषणा केली.

दरम्यान, उमेदवार घोषणेनंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ठरविण्यावरून काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण उफाळून आले होते. दिल्लीतील बैठकीत दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करताना वरिष्ठांनी ठरवलेल्या नावांना प्रदेश पातळीवरील नेत्यांची संमती मिळणे कठीण झाले होते. अखेर पक्षाने खलप आणि फर्नांडिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

नवा चेहरा म्हणून भिके यांच्या नावाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा प्रदेश पातळीवर अनेकांना होती. खुद्द भिके यांनाही आपणास उमेदवारी मिळेल, अशी अजूनही खात्री वाटत होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या नावाचा विचार कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर चालवला होता. मात्र, ते नाव मागे पडून खलप यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी केला गेला आहे.

Goa Congress
Goa Congress: दु:खी नाही पण नाराज! उमेदवारी न मिळाल्याने फ्रान्सिस सार्दिन बंडखोरीच्या तयारीत?

तसेच, दक्षिणेत काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा एकदा संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, यावेळी त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. त्याऐवजी काँग्रेसने कॅथलिक नेते कॅप्टन विरीयातो फनाँडिस यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, उमेदवारीची घोषणा न झाल्याने विजय भिके आणि फ्रान्सिस सार्दिन नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षकार्यालयात नव्या उमेदवारांच्या अभिनंदन कार्यक्रमाला देखील भिके आणि सार्दिन यांनी दांडी मारली.

उमेदवार घोषणेनंतर भिके आणि सार्दिन दोघांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांना उमेदवारी दिली असता निश्चित विजयी झाले असते, असाही खुलासा त्यांनी केला.

समर्थक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय भिके आणि फ्रान्सिस सार्दिन यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Goa Congress
Goa Congress: एकाचे कारगिल युद्धात योगदान दुसरे माजी केंद्रीय मंत्री! गोव्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कोण आहेत?

पाटकर, चोडणकर, युरींचा केवळ विचार

दक्षिण गोव्यातून आपल्याला उमेदवारी मिळू नये, यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी केला होता.

यावरून कॉंग्रेसमधील निर्णय कसे घेतले जातात, यावरच त्यांनी नकळतपणे प्रकाश टाकला होता. दक्षिण गोव्यातून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचीही संसदेत जाण्याची महत्त्वाकांक्षा उफाळून आली होती.

काही दिवसांपूर्वी पाटकर हेही इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते. कॅप्टन व्हिरीयाटो फर्नांडिस यांना कॉग्रेसने उमेदवारी दिल्यास ते चांगली टक्कर देतील, असे काँग्रेसमधीलच काहीजणांचे म्हणणे होते. त्यावर पक्षश्रेष्ठींनी मोहोर उमटवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com