Ketan Bhatikar Death: काँग्रेसला मोठा धक्का: डॉ. केतन भाटीकर यांचे निधन

Congress leader Ketan Bhatikar: गोव्याच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा आणि फोंडा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे माजी उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
Ketan Bhatikar Death
Ketan Bhatikar DeathDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा आणि फोंडा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे माजी उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. प्रवासादरम्यान अनमोड घाटात ही घटना घडली असून, प्राथमिक अंदाजानुसार सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. केतन भाटीकर हे प्रवास करत असताना अनमोड घाटात एका ठिकाणी थांबले होते. याच दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटे ३:३२ च्या सुमारास त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Ketan Bhatikar Death
Goa Drug Case: 61 व्या दिवशी आरोपपत्र संशयिताच्या पथ्यावर, ड्रग्स प्रकरणात साहील खानला 'डिफॉल्ट जामीन'

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

डॉ. भाटीकर यांच्या पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे सर्पदंशाचा संशय बळावला आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य प्रशासनाने कुळे पोलीस स्थानकाला पाचारण केले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Ketan Bhatikar Death
Goa Accident Death: कंटेनरच्या चाकाखाली संसाराचा चुराडा, बोरी येथील अपघातात महिलेचा मृत्यू; पती किरकोळ जखमी

फोंडा तालुक्यावर शोककळा

डॉ. केतन भाटीकर हे फोंडा भागात अत्यंत लोकप्रिय होते. रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली होती. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फोंडा आणि धारबांदोडा परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com