Amit Patkar: दक्षिण गोव्यात काँग्रेसला उभारी

व्यूहरचना आखल्‍यास लोकसभेत यश शक्‍य : भाजपकडून प्रचारही सुरू
Amit Patkar
Amit PatkarGomantak Digital Team

प्रमोद प्रभुगावकर

भाजप ज्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीला आपले दक्षिण भारतातील प्रवेशद्वार मानत होता, त्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवून भाजपला भुईसपाट केले व त्यामुळे गोव्यातील काँग्रेसला मात्र संजीवनी मिळाली आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघ राखण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष साव्हियो डिसिल्वा यांनी मडगाव मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर राहील, असे जे निवेदन केले आहे त्याला या दृष्टीने महत्त्व आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते आतापासून काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेतली तर हा मतदारसंघ राखणे तसे कठीण नाही. कारण सुरुवातीपासून हा मतदारसंघ काँग्रेसबहुल आहे. त्‍याचप्रमाणे काँग्रेसकडे मतदारांना वळविण्यासाठी तसे जड जाणार नाही; पण महत्त्‍वाची बाब म्हणजे, गोव्यात काँग्रेस कोणतीच निवडणूक गांभीर्याने घेत नाही, तर शेवटच्या क्षणी हालचाल करते.

Amit Patkar
Terrorist Attack: पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला, तीन जवानांसह एक दहशतवादी ठार

लोकसभा निवडणुकीचेच उदाहरण घेतले तर त्या निवडणुकीला अजून वर्ष असले तरी काँग्रेसने अजून कोणतीच पावले उचललेली नाहीत; तर दुसरीकडे भाजपचा प्रचार देखील सुरू झाला आहे. त्यांचा उमेदवारही ठरलेला आहे; तर काँग्रेसमध्ये उमेदवारच अधिक आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसचे केपे व कुंकळ्ळी असे दोनच आमदार आहेत; तर भाजपचे व त्यांना साथ करणारे आमदार अधिक आहेत. तरीही काँग्रेसची बाजू जमेची आहे; कारण आपचे दोन आमदार आहेत.

Amit Patkar
Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.5 तीव्रता

तेथील मतदार भाजपबरोबर जाण्याची जशी शक्यता कमी आहे, त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर भाजपमध्‍ये गेलेल्या काँग्रेसवाल्यांचे मतदार त्यांच्याबरोबर जातात की काँग्रेसशी निष्ठा ठेवतात ते या निवडणुकीतून उघड होणार आहे. भाजपला साथ देणाऱ्या कुठ्ठाळी व कुडतरी या दोन मतदारसंघांबाबतही तेच राहणार आहे.

Amit Patkar
G20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन

एक प्रकारे ती कसोटीची बाब ठरणार आहे. कारण आजवर दक्षिण गोव्यावर काँग्रेसचा पगडा राहिला होता तो सासष्टीतील मतदारांमुळे! पण सध्‍या तो तसा नाही याची अनेक कारणे आहेत. त्याचा त्या पक्षाने गांभीर्याने विचार केलेला नाही. कर्नाटकातील विजयाने त्या पक्षाला ती संधी प्राप्त झाली आहे; पण त्यासाठी मुळाक्षरापासून सुरुवात करावी लागेल. ते आव्हान काँग्रेस पक्ष कितपत पेलतो ते पाहावे लागेल.

Amit Patkar
IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

या मुद्यांवर चिंतन करणे गरजेचे

  • उमेदवाराबाबतच पाहिले तर काँग्रेसमध्ये विद्यमान खासदार सार्दिनपासून, कॅप्‍टन व्हिरिएतो फर्नांडिस, एल्‍विस गोम्स, गिरीश चोडणकर व खुद्द प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर असे एकाहून एक नेते रिंगणात आहेत. उमेदवारी कोणा एकालाच मिळाल्यावर बाकीचे व्यक्‍तिगत अहंभाव बाजूस ठेवून पक्षासाठी एकदिलाने वावरले तरच कर्नाटकमुळे मिळालेल्या संधीचे सोने करणे शक्य होणार आहे.

  • यावेळी फोंडा तालुका भाजपबरोबर आहे, याचा विचारही त्या पक्षाला करावा लागेल. 2019 मध्ये केवळ मडकईच्या सुदिन ढवळीकरांमुळे सार्दिन लोकसभेत पोहोचले होते हे उघड गुपित आहे. त्याचबरोबर मडगाव मतदारसंघ आपणाबरोबर नसणार व म्हणून काँग्रेसला एक प्रकारे ही निवडणूक एक आव्हान म्हणूनच पाहावे लागेल.

Amit Patkar
Chest Pain: तुमच्याही छातीत दुखतयं? असू शकतात 'या' 6 समस्या

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष राज्‍यात पूर्ण क्षमतेने प्रयत्‍न करेल. दोन्‍ही जागा आम्‍हालाच मिळतील, याची खात्री आहे. नेते, कार्यकर्ते तळागाळात पोहोचून काँग्रेसची ध्‍येय-धोरणे विषद करतील. जनता भाजपच्‍या राजवटीला कंटाळली आहे. त्‍याचाच परिणाम कर्नाटकातील निवडणुकीतून दिसून आलाय.

अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com