पणजी: आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाला आपले प्रतिज्ञापत्र सादर करणे तसेच आपल्या पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे बंधनकारक होते. यातच निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर करण्यात आलेल्या माहिती नुसार, विधानसभा निवडणुकीला (Goa Assembly Election) उभारलेल्या एकूण 301 उमेदवारांपैकी (Candidate) तब्बल 80 उमेदवारांवर गुहे नोंद आहेत, तर यामधील 29 जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत. (congress has highest number of candidates with criminal background in goa for assembly election)
यातील दोघांना पोलिस कोठडीची शिक्षा झाली आहे. एकाला आर्थिक घोटाळ्यात तर दुसऱ्याला मारहाणी संबंधी अटक करण्यात आली होती. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 251 उमेदवार होते तर यातील केवळ 39 उमेदवारांवर गुन्हा नोंद होता. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण बरेच वाढले आहे.
लैंगिक अत्याचार, विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोलीस स्थानकावर हल्ला,मारहाण,आर्थिक घोटाळे,आंदोलने,कोविड नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटले सुरू आहेत. सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार हे काँग्रेसचे आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
भाजप
प्रवीण आर्लेकर (पेडणे)
जोसेफ सिक्वेरा (कळंगुट)
रोहन खंवटे (पर्वरी)
बाबूश मोन्सेरात (पणजी)
जेनिफर मोन्सेरात (ताळगाव)
गोविंद गावडे (प्रियोळ)
रवी नाईक (फोंडा)
कृष्णा (दाजी) साळकर (वास्को)
मॉविन गुदिन्हो (दाबोळी)
अँथोनी बार्बोसा (कुडतरी)
चंद्रकांत कवळेकर (केपे)
रमेश तवडकर (काणकोण)
काँग्रेस उमेदवार
जितेंद्र गावकर (पेडणे)
मेघःश्याम राऊत (डिचोली)
सुधीर कांदोळकर (म्हापसा)
डिलायला लोबो (शिवोली)
मायकल लोबो (कळंगुट)
केदार नाईक (साळगाव)
टोनी रॉड्रिग्ज (ताळगाव)
रुडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रूझ)
राजेश फळदेसाई (कुंभारजुवा)
धर्मेश सगलानी (साखळी)
रणजीत राणे (पर्ये)
संकल्प आमोणकर (मुरगाव)
ओलॉइन्सिओ सिमोईश (कुठ्ठाळी)
दिगंबर कामत (मडगाव)
अंतोनियो डायस (बाणावली)
सावियो डिसिल्वा (वेळ्ळी)
खेमलो सावंत (सावर्डे)
रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी)
अनिश नाईक (डिचोली)
तुकाराम (मनोज) परब (थिवी व वाळपई)
रोहन कळंगुटकर (साळगाव)
शैलेश नाईक (शिरोडा)
तृणमूल काँग्रेस
तारक आरोलकर (म्हापसा)
संदीप वझरकर (पर्वरी)
जयेश शेटगावकर (मुरगाव)
गिल्बर्ट रॉड्रिग्ज (कुठ्ठाळी)
जुझे काब्राल (नुवे)
महेश आमोणकर (मडगाव)
चर्चिल आलेमाव (बाणावली)
आम आदमी पक्ष (आप)
प्रसाद शहापूरकर (मांद्रे)
रितेश चोडणकर (पर्वरी)
गोरखनाथ केरकर (कुंभारजुवा)
सत्यविजय नाईक (वाळपई)
प्रेमानंद नानोस्कर (दाबोळी)
संदेश तळेकर (फातोर्डा)
प्रतिमा कुतिन्हो (नावेली)
गॅब्रिएल फर्नांडिस (कुडचडे)
अभिजीत देसाई (सांगे)
मगोप
जीत आरोलकर (मांद्रे)
राजन कोरगावकर (पेडणे)
विश्वेश प्रभू (वाळपई)
केतन भाटीकर (फोंडा)
संकेत नाईक मुळे (शिरोडा)
बालाजी ऊर्फ विनायक गावस (सावर्डे)
राष्ट्रवादी काँग्रेस
गॉडफ्री डिलीमा (थिवी)
फ्रान्सिस्को पाशेको (नुवे)
स्टिव्हन डिसोझा (सांतआंद्रे)
मोहम्मद रेहान मुजावर (नावेली)
गोवा फॉरवर्ड पक्ष
विजय सरदेसाई (फातोर्डा)
शिवसेना
जितेश कामत (म्हापसा)
संभाजी ब्रिगेड पक्ष
मारिया डिकॉस्टा (मांद्रे)
गोंयचो स्वाभिमान
रोशन माथायिस (कळंगुट)
अपक्ष
विष्णुदास कोरगावकर (पेडणे)
सतीश शेटगावकर (मांद्रे)
पेट्रिक सावियो आल्मेदा (शिवोली)
विनोद पालयेकर (शिवोली)
रामा काणकोणकर (सांतआंद्रे)
रोहन हरमलकर (कुंभारजुवा)
सुनील फुलारी (साखळी)
सुनील सातोडकर (साखळी)
नीलेश नावेलकर (मुरगाव)
चंद्रशेखर वस्त (वास्को)
तारा केरकर (दाबोळी)
फ्रान्सिस्को कुलासो (नावेली)
सुदेश भिसे (कुंकळ्ळी)
दीपक प्रभू पाऊस्कर (सावर्डे)
सावित्री कवळेकर (सांगे)
कनय पागी (काणकोण)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.