पणजी: गोवा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर बड्या राजकीय नेत्यांचा गोवा दौरा वाढला आहे. काल शुक्रवारी राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले. तर पुढील आठवड्यात कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या गोवा दौऱ्यावर आहेत; विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) गोव्यात येणार असून, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दूसरा गोवा दौरा असणार आहे. (Priyanka Gandhi will visit Goa next week on backdrop of assembly election)
राहुल गांधी यांनी दिले अश्वासने
गरिबांना प्रति महिना 6 हजार रुपये तर सामान्य जनतेसाठी 80 रुपयांत पेट्रोल देण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साखळी येथील जाहीर सभेत दिले. तसेच शेती, पर्यटन, वीज, पाणी, खाण, पर्यावरण यासारख्या विविध प्रश्नांची काँग्रेसची (Goa Congress) भूमिका मांडणाऱ्या रोड मॅप गोवा व्हिजन 2035 असा जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.
कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
साखळीतील सभेसाठी राहुल गांधीचे (Rahul Gandhi) सायंकाळी 5 वाजता आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोविड मार्गदर्शक तत्वाचे पालन करून एक हजार लोकांना सभेसाठी सोडण्यात आले. अनेकांनी बाहेर थांबूनच भाषण ऐकले. राहुल गांधीच्या सभेमुळे कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला.
मुख्यमंत्री सावंत यांनी भ्रष्टाचार करून गोवा संपविला व लुटला. जनतेला केवळ आश्वासनेच दिली. बेकारी, महागाई वाढवली. जनतेने या मुख्यमंत्र्याला व भाजप सरकारला अद्दल घडवावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.