Road Construction In Goa: दहा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
Amit Patkar GoaDainik Gomantak

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

Road Construction In Goa: दहा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
Published on

पणजी - रस्ते दुरुस्तीच्या कामात पूर्ण पारदर्शकता आणावी अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाने आज (19 सप्टेंबर) मुख्य अभियंत्यांसमोर प्रकट केले असून असून दहा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

रस्ता दुरुस्तीच्या कामांचे सर्व तांत्रिक तपशील सार्वजनिक केले जावेत तसेच रस्त्यांच्या कामादरम्यान गुणवत्ता नियंत्रण तपासणीची मागणीही काँग्रेसने केली आहे.

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी अशा कंत्राटदारांची नावे सार्वजनिक केली जावीत, असे अमित पाटकर यांनी नमूद केले आहे.

Road Construction In Goa: दहा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

वर्क ऑर्डरनुसार करण्यात येणाऱ्या कामाचा तांत्रिक आणि व्यावसायिक तपशील असावा तसेच कामाचा आदेश जारी केल्याशिवाय कोणतीही कामे सुरू करू नयेत असा इशारा काँग्रेसने पीडब्ल्यूडीला दिला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याला रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणीचे वर्क ऑर्डर प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे, यामुळे सदर काम कोणाच्या हाती आहे हे सामान्य लोकांना समजेल आणि कंत्राटदाराला जबाबदार धरण्यास मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि अधिकारी यांनी रस्त्यांची कामे सुरु असलेल्या ठिकाणी सतत भेट देत कामाचा दर्जा तपासाला पाहिजे असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com