चाररस्ता ते माशे बायपास रस्त्याच्या हॉटमिक्सिंगवर प्रश्नचिन्ह

काँग्रेसकडून मनोहर पर्रीकर बायपास रस्त्याचं बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप
Road Construction in Canacona
Road Construction in CanaconaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण : काणकोणमध्ये चाररस्ता ते माशे पर्यंतच्या मनोहर पर्रीकर बायपास रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहे. कॉंग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी या रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (Road Construction in Canacona News Updates)

Road Construction in Canacona
सोनसोडोवरील आग दुसऱ्या दिवशीही धुमसतीच

काणकोण (Canacona) परिसरात चाररस्ता ते माशेदरम्यान लाखो रुपये खर्चून बायपास रस्त्याचं बांधकाम केलं जात आहे. या रस्त्याला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं नावही देण्यात आलं आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी आता या रस्त्याच्या बांधकामावर आक्षेप घेत त्यातील त्रुटी समोर आणल्या आहेत.

Road Construction in Canacona
होळीनिमित्त कोकण रेल्वेच्या खास गाड्या

कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी ही बाब कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिली आहे. कायद्याप्रमाणे ठराविक जाडीचे हॉटमिक्स कार्पेट रस्त्यावर घालणे बंधनकारक असताना नियमानुसार हे डांबरीकरण होत नाही. अशाच प्रकारे डांबरीकरण झाल्यास एका वर्षातच डांबर निघून बायपास रस्ता खड्डेमय होणार असल्याचा दावा भंडारी यांनी केला आहे. बायपास रस्ता वाहतुकीसाठी (Traffic) खुला होऊन काही कालावधी लोटला असताना बायपास रस्त्यावरील डांबर काही ठिकाणी उखडल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com