Goa Congress: आचारसंहिता सुरू असताना भाजपचा प्रचार; कॉंग्रेसचा भाजपवर आरोप

Goa Congress: 'आचारसंहिता सुरू असताना भाजप विकसित भारत संकल्प पत्राच्या निमित्ताने सरकारी खर्चाने निवडणुकीचा प्रचार करत आहे’.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress:

'आचारसंहिता सुरू असताना भाजप विकसित भारत संकल्प पत्राच्या निमित्ताने सरकारी खर्चाने निवडणुकीचा प्रचार करत आहे’, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. तशी तक्रार केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य मतदार अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बुधवारी दिली.

काँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी विविध मुद्यांवर भाष्‍य केले. ते म्‍हणाले, राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी टीका केली आहे. त्‍यासंदर्भात पोलिस आणि निवडणूक यंत्रणेकडे तक्रार केली जाईल.

उत्तर व दक्षिण गोव्यातून जनतेसोबत असलेल्या, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असलेल्यांना कॉंग्रेस यंदा लोकसभेसाठी उमेदवारी देणार आहे, असे सांगून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उत्सुकता वाढवली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.

Goa Congress
Goa Politics: अनुसूचित जमातीच्‍या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चिघळणार?

उमेदवार निवडीसाठी शुक्रवार उजाडणार

1. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी (ता.२१) किंवा शुक्रवारी (ता.२२) दिल्लीत होईल आणि त्यात हे उमेदवार ठरतील व लगेच जाहीर केले जातील, असे पाटकर यांनी सांगितले.
2. या बैठकीला आपण व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित राहणार असून आम्हाला विश्वासात घेऊनच उमेदवार ठरतील असे त्यांनी नमूद केले.
3. आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का, या प्रश्नावर सरळ उत्तर देण्याचे पाटकर यांनी टाळले.
4. भाजपने आपल्या उत्तर गोव्यातील खासदाराला पुन्हा उमेदवारी दिली; काँग्रेस आपल्या दक्षिण गोव्यातील खासदाराला पुन्हा उमेदवारी देणार का, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले नाही.


Goa Congress
Professional League Football: स्पोर्टिंग गोवाने कुठ्ठाळी व्हिलेजर्सला रोखले; रोहन रॉड्रिग्जचा गोल ठरला निर्णायक

उत्तरेत निम्‍मी निम्‍मी संधी

  • पाटकर म्हणाले, गोव्यात काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी आणि दोन्ही जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिणेत काँग्रेस विजयी होणारच आणि उत्तर गोव्यात ५०ः५० जिंकण्याचा अंदाज गुप्तचर अहवालात स्पष्ट झाल्याने भाजप बिथरला आहे. उत्तरेतही आम्हीच जिंकू.


  • कॉंग्रेस नेते महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि आपले गोमंतकीय पुुरुषोत्तम काकोडकर आणि इतरांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि गोवा मुक्ती चळवळीतील बलिदान आणि योगदानामुळेच डॉ. प्रमोद सावंत यांना स्वतंत्र भारत आणि मुक्त झालेल्या गोव्यात जन्माला आल्याचे सांगणे शक्य झाले आहे.


एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर, भाजप सरकार विकसित भारत मोहिमेसारखे कोणतेही प्रचारात्मक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. भाजपचे स्कार्फ व टोप्या यांचा वापर सरकारी कार्यक्रमात होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने यावर त्वरित बंदी न घातल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू.

- कार्लुस फेरेरा, काँग्रेस आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com