Comunidades of Goa: कोमुनिदाद समितीमध्ये संभ्रम! इमारत सरकारला कायमस्वरुपी पाहिजे की; केवळ दुरुस्तीपुरती?

Comunidades of Goa: इमारतीचा ताबा सरकारकडे कसा द्यावा, यासंदर्भात मडगाव कोमुनिदाद समितीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Comunidades of Goa building
Comunidades of Goa buildingDainik Gomantak

Comunidades of Goa: सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना मडगाव येथील कोमुनिदाद इमारतीची अवस्था पाहून ती सरकारतर्फे दुरुस्त करण्याचा विचार त्यांनी पत्रकारांकडे बोलून दाखवला आहे. मात्र, दुरुस्तीसाठी इमारतीचा ताबा सरकारकडे कसा द्यावा, यासंदर्भात मडगाव कोमुनिदाद समितीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सरकार या इमारतीची देखभाल करण्यासाठी तयार असून दुरुस्ती कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले होते. यावर मडगाव कोमुनिदादचे ॲटर्नी सेलेस्टीन नोरोन्हा यांनी सांगितले की, कोमुनिदाद इमारत सरकारच्या ताब्यात देण्यास हरकत नाही; पण मंत्री काब्राल यांनी यासंदर्भात आपले मनसुबे स्पष्ट केले पाहिजेत.

Comunidades of Goa building
Trinamool Congress Goa: कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करा- ट्रोजन डिमेलो

सरकारला ही इमारत कायमस्वरूपी ताब्यात पाहिजे की, केवळ दुरुस्तीपुरती, हे प्रथम स्पष्ट झाले पाहिजे. शिवाय दुरुस्तीचा खर्च नेमका किती असेल याचा अंदाजही आम्हाला दिला पाहिजे. लाखो रुपये सरकारला देण्याइतकी कोमुनिदादची क्षमता आहे का, याचाही अभ्यास करावा लागेल. मात्र, ही इमारत कायमस्वरूपी सरकारच्या ताब्यात देणे शक्य नाही.

इमारत सुरक्षित असल्याचा अहवाल

ही इमारत भव्य-दिव्य आहे. शिवाय शहराच्या अगदी मध्यभागी आहे. आम्हाला या इमारतीचा काही भाग भाड्याने देऊन त्यातून कोमुनिदादसाठी महसूल गोळा करायचा आहे, असे ॲटर्नी नोरोन्हा यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या इमारतीचे सर्वेक्षण केले होते. त्यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे ही इमारत सुरक्षित आहे. त्याचबरोबर दुरुस्तीचा आराखडाही त्यांनी तयार करून सरकारला दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com