Trinamool Congress Goa: खासगी शैक्षणिक संस्थांना कौशल्य विकासासाठी निधीचा आवश्यकता आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली पाहिजे, अशी सूचना तृणमूल काँग्रेसचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी केली.
पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे संयोजक समील वळवईकर आणि पक्ष प्रवक्ते जयेश शेटगावकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सीएमआय’ने बेरोजगारीविषयी दिलेला अहवाल मान्य केला आहे. या अहवालानुसार गोव्यात बेरोजगारीचा दर 13 टक्के आहे.
तसेच, त्यानुसार राज्यात 70 टक्के युवक बेरोजगार आहेत. ते पदवीधर असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु यासाठी केवळ सरकार जबाबदार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली
आहे. गेल्या 10 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. आता मोपा विमानतळ सुरू होणार हे माहीत. मग सरकारने विमान वाहतूक आणि पर्यटन उद्योगात कौशल्य निर्माण करण्यासाठी काय केले आहे. राज्यातील तरुण आमचे भविष्य असून त्यांच्यासाठी सरकारने काय केले, असा प्रश्न ट्रोजन डिमेलो यांनी यावेळी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.