Aadhaar-PAN link: आधार-पॅन लिंकसाठी गोंधळ

फोंड्यातील केंद्रांवर गर्दी : मुदत वाढवून दंड कमी करण्याची मागणी
Adhar- Pan Card
Adhar- Pan CardDainik Gomantak
Published on
Updated on

फोंड्यात सर्व सायबर केंद्रांवर आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. 31 मार्चपूर्वी आधार-पॅन कार्ड लिंक न केल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार, या भीतीनेच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. सध्या भरावा लागणारा एक हजार रुपयांचा दंडही सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडेनासा झाल्याची प्रतिक्रिया येथे भेट देणाऱ्या नागरिकांनी दिली.

आधार-पॅन कार्ड जोडणी करण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा. हजार रुपये दंड सामान्य जनतेला परवडणारा नसून तो शुल्क कमी करावा, अशी मागणी ॲड. सुरेल तिळवे यांनी केली आहे. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची म्हणावी तशी जागृती भाजप सरकारने तसेच लोकप्रतिनिधींनी केली नसल्यामुळे हा मोठा गोंधळ उडाला आहे.

Adhar- Pan Card
कुठ्ठाळीत सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रकल्पाचा शुभारंभ; आमदार आंतोन वास यांचे इतर पंचायतींना आवाहन

आधार-पॅन लिंक करण्यासाठी आउटसोर्सिंग केल्यामुळेही सायबर केंद्राचा मनमानी कारभार सध्या सुरू आहे. आपल्या मनात येईल तो दर सांगून ते मोकळे होत असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केलेल्या आहेत.

Adhar- Pan Card
Women Development: हेडलॅण्ड- सडा येथे महिलांना आमदार संकल्प आमोणकरांतर्फे शिलाई मशिन्सचे वाटप

सरकारने जागृती करावी

अंतिम मुदतीपैकी जेमतेम सहा दिवस शिल्लक असताना लोकांची धावपळ उडाली आहे. काही ग्राहकांना आपले आधार -पॅन कार्डाशी जोडणी झालेली आहे की नाही याबाबतच पक्की माहिती नाही.

खराब इंटरनेटचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. सरकारने नोटबंदीनंतर परत एकदा ज्येष्ठांवरही रांगेत उभे राहण्याची वेळ आणलेली आहे. यावर त्वरित मुदत वाढवून द्यावी, दंडाची रक्कम कमी करावी व जागृती करून ही प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी मागणीही ॲड. सुरेल तिळवे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com