बार्देश रवींद्र भवनासाठी कुचेलीतील जागा निश्‍चित!

मंत्री गावडे, जोशुआंकडून जागेची पाहणी
Joshua De Souza
Joshua De Souza Dainik Gomantak

बार्देशमधील प्रलंबित रवींद्र भवन उभारण्यासाठी प्रशासनाने आता हालचाल सुरू केली आहे. या अनुषंगाने आज सोमवारी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, स्थानिक आमदार जोशुआ डिसोझायांनी कुचेली कोमुनिदाद मालकीच्या जागेची पाहणी केली. रवींद्र भवनाच्या बांधकामासाठी ही जागा आदर्श ठिकाण असल्याचे मत मंत्री गावडे यांनी व्यक्त केले.

मंत्री गावडे म्हणाले की, कुचेली कोमुनिदादची ही जागा बार्देश रवींद्र भवनाच्या बांधकामासाठी आदर्श ठिकाण आहे. यासाठी कुचेली कोमुनिदादने ठराव घेऊन आवश्यक सोपस्कार खात्याकडे पार पाडावेत. जेणेकरुन प्रशासकीय प्रक्रियेला वेग देता येईल.

Joshua De Souza
सनबर्न ध्वनी प्रदूषण चौकशीत सारवासारव; अहवाल द्या

बार्देश रवींद्र भवनास आपले सर्वोच्च प्राधन्य राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपाध्यक्ष विराज फडके, इतर नगरसेवक तसेच कुचेली कोमुनिदादचे अध्यक्ष शिवानंद धावजेकर, अटर्नी मायकल कारास्को हे हजर होते.

नवीन आर्थिक वर्षांत कला व संस्कृती खात्याकडून बार्देश व पेडणे या दोन रवींद्र भवनांची कामे पहिल्या यादीत असतील. तसेच कुचेली कोमुनिदादची जमिन बार्देश रवींद्र भवनासाठी योग्य जागा आहे. कारण जवळच महामार्ग असून याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही.

- गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

Joshua De Souza
Eye Care Tips: दृष्टी कमी होण्याची भीती आहे? आजपासूनच फॉलो करा 'या' 6 टिप्स

Eye Care Tips: दृष्टी कमी होण्याची भीती आहे? आजपासूनच फॉलो करा 'या' 6 टिप्सम्हापसेकर किंबहुना बार्देशवासीय रवींद्र भवनासाठी इच्छुक आहेत. कुचेली कोमुनिदादने जागा देण्यास तयारी दर्शविली असून कला व संस्कृती मंत्र्यांना ही जागा पसंत पडली आहे. या रवींद्र भवनाचा सर्वांनाच फायदा होईल. रवींद्र भवन हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. जे लवकरच आता सत्यात उतरेल. याविषयी लवकरच सर्व भागधारकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेतले जाईल.

- जोशुआ डिसोझा, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com