सनबर्न ध्वनी प्रदूषण चौकशीत सारवासारव; अहवाल द्या

मुख्य सचिवांना खंडपीठाचे निर्देश
Court | Goa Crime News
Court | Goa Crime News Dainik Gomantak

गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस हणजूण येथे झालेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी झालेल्या ध्वनी प्रदूषणप्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश आज गोवा खंडपीठाने मुख्य सचिवांना दिले.

या इव्हेंटच्या आयोजनासाठी केलेल्या अर्ज प्रक्रियेची माहितीही याचिकादारासह प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच आयोजकांना सादर करण्यास लावून पुढील सुनावणी 15 मार्चला न्यायालयाने ठेवली आहे.

Court | Goa Crime News
Kiren Rijiju : संपूर्ण देशभरात सुमारे 5 कोटी खटले प्रलंबित : मंत्री रिजिजू

सनबर्न ईडीएम महोत्सवासाठी दिलेल्या परवानगीपेक्षा मोठ्या आवाजाने संगीत वाजवण्यात आले होते. त्यामुळे तेथील स्थानिकांना झालेल्या त्रासप्रकरणी जनहित याचिका सादर झाली होती. या याचिकेची दखल घेऊन त्यावरील सुनावणी सुरू आहे.

गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य सचिवांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केलेला अहवाल सादर केला त्याबाबत उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. या अहवालात या ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई कऱण्यास यशस्वी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीसह तो सादर करण्यात आला.

म्हापशाचे उपजिल्हाधिकारी व म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमधील समन्वयातील चुकांमुळे हे घडले आहे असा निष्कर्ष काढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com