'Goa First'कडून वास्को फायर आणि इमर्जन्सी सर्विसविरुद्धात तक्रार दाखल

स्टॉलवरच्या खाद्य पदार्थांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात
vasco News
vasco News Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को सप्ताह फेरीत गोबी मंचुरियन स्टॉल आणि जिलेबी, सामोसा स्टॉलवर स्वयंपाक करण्यासाठी हाय फ्लेम गॅस स्टोव्हचा उपयोग करण्यास परवानगी दिल्याबद्दल गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने वास्को फायर आणि इमर्जन्सी सर्विस स्टेशन अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

(Complaint filed by 'Goa First' organization against Vasco Fire Brigade and Emergency Service Station)

vasco News
Smriti Irani : 'सिली सोल्स' प्रकरणात सरकारकडून स्मृती इराणींची पाठराखण

वास्को सप्ताह गोव्यातील उत्सवापैकी मोठा उत्सव असून या सप्ताहात गोव्यातील तसेच इतर शेजारी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावतात. दरम्यान यंदा वास्को सप्ताहात थाटण्यात आलेल्या फेरीत खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स लावलेले आहेत जे अनिवार्य आहेत. अन्न आणि औषधे आणि अन्नसुरक्षा परवानगी आवश्यक आहे.

vasco News
Michael Lobo : मायकल लोबो आणि फ्रान्सिस सिल्वेरा यांच्याविरुद्ध ‘एसीबी’कडे तक्रार
vasco News
vasco News Dainik Gomantak

मात्र वास्को सप्ताह फेरी थाटण्यात आलेल्या अन्न आउटलेटमध्ये गोबी मंचुरियन, जिलेबी, सामोसा स्टॉलवर मोठे हाय फ्लेम गॅस स्टोव्ह वापरतात आणि स्वयंपाक करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडर ऐवजी घरगुती सिलेंडर वापरतात. हे स्टॉल्स गजबजलेल्या फेरीत आत असल्याने तेथे तसेच सिलेंडर आणि उच्च स्टोव्ह गॅसमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास भाविकांना बाहेर जाण्याची कोणती सोय नसल्याने धोक्याचे ठरले आहे.

दरम्यान वास्को अग्निशमन दलात दलाने अशा दुर्घटनेचा परिणाम जाणून घेऊन ही अशा स्टॉल्सना परवानगी दिली आहे. काही स्टॉल्स ना आगीची परवानगी नाही, तसेच यापैकी बहुतेक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पोर्टेबल अग्निशमन यंत्रणा देखील नाही.

जिलेबी, सामोसा आदि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर गर्दी पासून अर्धा मीटर अंतरावर गॅस स्टोव्ह ठेवतात या सर्व बाबी लक्षात घेऊन गोवा फर्स्टने या फूड स्टॉलला दिलेली परवानगी मागे घेण्याची मागणी वास्को- अग्निशमन दलाकडे केली आहे. कोणतीही कारवाई न केल्यास सदर तक्रार उच्च अधिकाऱ्यांकडे केली जाणार असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com