Death Case: ओडेलिया सिल्‍वा मृत्‍यू प्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Death Case: नावेली येथे झाडाची फांदी कोसळून पडल्‍याने मृत्‍यू आलेल्‍या स्‍कूटरस्‍वार ओडिलिया सिल्‍वा हिच्‍या मृत्‍यूला दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हा प्रशासन जबाबदार
Death Case
Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Death Case: नावेली येथे झाडाची फांदी कोसळून पडल्‍याने मृत्‍यू आलेल्‍या स्‍कूटरस्‍वार ओडिलिया सिल्‍वा हिच्‍या मृत्‍यूला दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हा प्रशासन जबाबदार असल्‍याचा आरोप ग्रीन गोवा फाऊंडेशन या संघटनेने केला असून

Death Case
Illegal Hoardings: बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची महापालिकेची न्यायालयात ग्वाही

या मृत्‍यूला दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हाधिकारी, दक्षिण गोव्‍याचे उपवनपाल आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अभियंत्‍यांना जबाबदार धरून त्‍यांच्‍या विरोधात सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, अशा आशयाची तक्रार मडगाव पोलिस स्‍थानकात या संघटनेचे अध्‍यक्ष रेझन आल्‍मेदा यांनी दाखल केली आहे.

Death Case
Electricity Bill: वीज बिल घाेटाळा प्रकरण रखडले

26 सप्‍टेंबर रोजी ही दुर्घटना घडली हाेती. आपल्‍या मुलीला महाविद्यालयात सोडण्‍यात जात असलेल्‍या सारझाेरा-कुंकळ्‍ळी येथील ओडिलिया सिल्‍वा हिच्‍या चालत्‍या स्‍कूटरवर ही झाडाची फांदी तुटून पडल्‍याने तिला मृत्‍यू आला होता. ग्रीन गोवा फांऊडेशनने 2011 पासून रस्‍त्‍यावरील धोकादायक झाडांबद्दल जिल्‍हा प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले होते.

रस्‍त्‍यावरील झाडांच्‍या फांद्या पडू्न यापूर्वी जे अपघात झाले आहेत, त्‍याची यादी जिल्‍हा प्रशासनाबरोबर वन खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याला देऊनही त्‍यांनी उपाययोजना केली नाही. त्‍यामुळेच हा अपघात घडला, असा दावा करून अपघाताला जिल्‍हा प्रशासन व इतर दोन खाती जबाबदार असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com