पीक हानी झाल्यास मिळणार भरपाई; बळीराजाला दिलासा

सुधारित शेतकरी आधार निधी योजना गोवा सरकारकडून अधिसूचित
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्य सरकारने सुधारित शेतकरी आधार निधी योजना अधिसूचित केली आहे. यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाल्यास नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, पाऊस, भूस्खलन आणि गाळ, कीड आणि रोगांच्या साथी, अवकाळी पाऊस, आगीची दुर्घटना यासारख्या विविध कारणांमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल.तसेच ढग फुटी,भूकंप,वन्य प्राणी इत्यादी. नुकसान झालेले पीक, संख्या आणि प्रकार , वर्षे इत्यादी नुकसान भरपाईचे प्रमाण अधिसूचनेत नमूद केले आहे.

या योजनेत शेतातील पिके, बागायती पिके, मसाले, औषधी वनस्पती, फुलशेती, शेतातील राखीव भिंत, कुंपण, विहीर, सिंचन व्यवस्था आणि पाइपलाईन, पंप आणि ग्रीन हाऊस यासारख्या पायाभूत सुविधांचे नुकसान भरून काढले जाईल. त्याचप्रमाणे, विक्रीसाठी तयार असलेले कृषी उत्पादन, कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणे यांच्या नुकसानीचा योजनेत समावेश केला जाईल.

Goa Farming
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर चोरट्यांचा सुळसुळाट

शेतकऱ्याला नगदी पीक लागवडीपासून रोखणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचाही या योजनेत समावेश केला जाईल. गाळ साचल्यामुळे होणारा डेब्रिज काढण्यासाठी येणारा खर्चही शेतकरी आधार निधी अंतर्गत समाविष्ट केला जाईल, अशी माहिती अधिसूचनेत दिली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक किसान कार्ड आणि कृषी कार्ड बनवून घेणे आवश्‍यक असल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले. शिवाय शेतकऱ्यांनी पीक विम्यासंबंधीही कृषी कार्यालयातून माहिती घ्यावी,असे कळवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Hoysala Dynasty Garuda Lenka Warriors
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com