Farmer Compensation: शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या भरपाईची फाईल वित्त विभागात पाठवली असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात शेतकऱ्यांना भरपाई देणार
Goa FloodDainik Gomantak

गोव्यातील शेतकऱ्यांना खुशखबर! आठवड्याभरात मिळणार भरपाई; ३.९० कोटींचे वितरण

Farmer Compensation: शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या भरपाईची फाईल वित्त विभागात पाठवली असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात शेतकऱ्यांना भरपाई देणार
Published on

पणजी: राज्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कृषी कार्डधारक तसेच कृषी कार्ड विरहित शेतकऱ्यांना सुमारे ३.९० कोटींची भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या भरपाईची फाईल वित्त विभागात पाठवली असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे.

अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी ‘गोमन्तक’ला दिली. फळदेसाई म्हणाले, पूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार ३.७० कोटींच्या भरपाईचा अंदाज बांधला होता. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांचे आलेले अर्ज पाहता अजून २० लाख रूपयांची अधिकची नुकसान भरपाई द्यावी लागेल त्यामुळे सुमारे ३.९० कोटींची भरपाई शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत,असे त्यांनी सांगितले.

Farmer Compensation: शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या भरपाईची फाईल वित्त विभागात पाठवली असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात शेतकऱ्यांना भरपाई देणार
Goa Flood Compensation: अतिवृष्टीमुळे नुकसान संबंधित २९२ जणांना नुकसानभरपाई; व्‍यवस्‍थापन विभागातील अधिकाऱ्यांची माहिती

शेतकऱ्यांचे आश्‍वासनपूर्तीकडे डोळे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई देणार असे विधानसभेत जाहीर केले होते. त्यानुसार कृषी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकरवी नुकसानीचे सर्वेक्षण केले आहे फाईल वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठवली आहे. परंतु आता चतुर्थी अवघेच काही दिवस बाकी असल्याने या नुकसान भरपाईत चतुर्थी सुखाची जावी यासाठी या हातावर पोट असलेल्या, केवळ शेतीच उपजिविकेचे साधन असलेले शेतकरी या नुकसान भरपाईची वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com