Fire In Goa: सत्तरीचा पश्‍चिम घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

मानवी कृतीचा निसर्गावर घाला : मोर्ले, चोर्ला, केरी, साट्रे, देरोडे, चरावणे हा भाग संवेदनशील
Fire In Goa
Fire In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fire In Goa Wildlife Sanctuary: सत्तरी तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून आगीने थैमान घातलेले आहे. यामागे मानवी हव्यास कृती आहे, हेच स्पष्ट होते आहे. या आगीमुळे सत्तरीच्या चारही बाजूंनी असलेल्या वनराईवर मात्र मोठा आघात झालेला आहे.

सत्तरी तालुक्यात पूर्वेकडे असलेल्या डोंगरावरील अर्थातच पश्चिम घाटातील जैविक संपदा नष्ट झालेली आहे. सत्तरीचा पश्चिम घाट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. त्याचे वाईट परिणाम भविष्यात नक्कीच लोकांना भोगावे लागणार आहेत.

लोकांची अमानवी कृती-

पर्यावरण अभ्यासक केरीचे राजेंद्र केरकर म्हणाले, गेल्या बऱ्याच वर्षांपासून सत्तरीत म्हादई अभयारण्य व लोक असा ज्वलंत संघर्ष निर्माण झालेला आहे. लोक आपली बागायती वाढविण्यासाठी म्हादईच्या क्षेत्रात अतिक्रमण करू पाहात आहेत.

त्यासाठी काहीही केले जाते आहे. सध्या लावलेल्या आगी या मानवी संघर्षाचेच प्रतिबिंब म्हणावे लागेल. मोर्ले, चोर्ला, केरी, साट्रे, देरोडे, चरावणे हा भाग संवेदनशील जैवविविधतेने नटलेला प्रदेश आहे. अशांवर मानवाकडून घाला घालणे दुर्दैव म्हणावे लागेल.

Fire In Goa
Mopa International Airport: मोपा’वरील नोकऱ्यांत गोमंतकीयांना प्राधान्य न दिल्यास छेडणार आंदोलन’

आग लागलेली गावे

साट्रे : वाळपईपासून १८ किलोमीटर अंतरावर असून पूर्व दिशेत आहे. येथील पूर्व-दक्षिण दिशेच्या डोंगराला आग लागलेली आहे. म्हादई अभयारण्याचा हा परिसर आहे.

देरोडे : वाळपईपासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. म्हादई अभयारण्याचा परिसर असून पूर्व दिशेला डोंगराला आग लागलेली आहे.

चरावणे : वाळपईपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असून पूर्व-दक्षिण असा भाग आहे.

चोर्लाघाट : वाळपईपासून सुमारे ३५ किलोमीटर आहे.

केरी : वाळपईपासून १८ किलोमीटरवर आहे.

मोर्ले : वाळपईपासून १५ किलोमीटरवर आहे.

Fire In Goa
Goa Crime: नुरानी दरोडा - संशयिताला तब्बल 20 वर्षांनंतर अटक

निरीक्षणे...

  • शनिवारी साट्रे येथे जंगलाला आग लागल्याची माहिती; पण लोकांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारपासूनच आगीला सुरुवात झालेली असावी.

  •  शनिवारी आगीची घटना समोर येताच तत्काळ हवाई मार्गानेच पाण्याचा फवारा वनक्षेत्रात गरजेचा होता.

  •  अत्यंत उंच, चढत्या, खडी-दगड असलेल्या डोंगरावर जाऊन आग हाताने विझविणे अशक्य गोष्ट होती.

  •  रविवारी चोर्लाघाटात दुसरी आगीची घटना. हा भाग अगदी एका बाजूने उतरणीचा असून तिथे जाणे कसरतीचेच.

  •  रविवारी साट्रे गडावर आगीने पेट घेतला. म्हादई वन विभाग, स्थानिक नागरिकांची धावाधाव झाली.

  •  सोमवारी चरावणे, वाघेरी परिसर, केरी भागात आगीची तिसरी घटना.

  •  मंगळवारी मोर्लेच्या गडावर चौथी घटना समोर आली.

  • तातडीने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली व रात्री मोर्लेच्या सभामंडपात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. तिथे कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.

  • मंगळवारी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पिसुर्ले खनिज डंपातून पाणी नेऊन चोर्ला, केरी परिसरात फवारणी करण्यात आली.

  •  बुधवारी पुन्हा मोर्ले परिसर, देरोडे गावात पाणी मारण्यास हवाई मदत घेतली. मंगळवारी देरोडेतून पारवाड-कर्नाटकात आग पोहोचल्याची बातमी.

    एकूणच घटना पाहता आपत्कालीन हवाई यंत्रणा किती सज्ज असावी लागते याची प्रचीती येते. सत्तरीत अशी जंगलाला आग लागल्याची पहिलीच घटना. त्याला सामोरे जाताना वन खात्याला नाकीनऊ आले आहेत.

  • वन अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली आहे.  जोराचा वारा, कडक ऊन व उकाड्यामुळे धोका वाढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com