South Goa: जैवविविधता समित्यांची समाजाभिमुख कामगिरी

दक्षिण गोव्यातील खासकरून काणकोण तालुक्यातील विविध जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत.
Bio Diversity
Bio DiversityDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa: दक्षिण गोव्यातील खासकरून काणकोण तालुक्यातील विविध जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. कोरोना महामारीच्या काळातही या समित्यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यामध्ये काणकोण तालुक्यातील श्रीस्थळची समिती अव्वल ठरली. त्यानंतरच्या काळातही या समित्यांनी भरीव कामगिरी करत सामाजिक उपक्रमांत अमीट ठसा उमटविला आहे.

सार्वजनिक जैवविविधता नोंदवही (पीबीआर) तयार करणारी श्रीस्थळ जैवविविधता व्यवस्थापन समिती काणकोण तालुक्यात पहिली ठरली आहे. या समितीने सादर केलेल्या पीबीआरला राज्य मंडळाने मान्यता दिली आहे.

या समितीचे सदस्य दामोदर च्यारी, शिरीष पै यांना मंडळाचा वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. समितीचे अध्यक्ष विनय तुबकी यांच्या नेतृत्वाखाली समिती वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.

हल्लीच आदर्श ग्राम पैंगीण येथे झालेल्या लोकोत्सवात समितीच्या पुढाकाराने मंडळाने पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला यांचे दालन उघडले होते. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवाय कलाकारांच्या कौशल्याचेही चीज झाले.

काणकोण तालुक्यातील सर्व सातही पंचायतींच्या समित्या सकारात्मक कार्य करत आहेत. मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे समित्यांनी समाजात भरीव योगदान दिले आहे.

Bio Diversity
Bhajan: पाल-सत्तरीत रंगली भजन संध्या मैफल

सासष्टी तालुक्यातील कुडतरीची समिती अध्यक्ष सांतान रॉड्रिग्स यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. राज्यातील पहिला पीबीआर या समितीने सादर केला होता. सीड बँकसारखा उपक्रम त्यांनी राबविला आहे. कुडतरीतील एका नैसर्गिक तळीचे वारसा स्थळ म्हणून नोंद करण्यात समिती यशस्वी ठरली आहे.

रिवणच्या समितीने एका विशिष्ट वनस्पतीची ‘वारसा वनस्पती’ म्हणून नोंद केली आहे. जैवविधता मंडळातर्फे कुडचडे व पाळी या दोन ठिकाणी ‘गोवन ब्रॅण्ड’ नावाखाली प्रक्रिया केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांतून पारंपरिक खाद्यपदार्थांची निर्मिती करून त्यांची विक्री करण्यात येते.

पैंगीण, लोलये व खोतीगावातील समित्याही क्रियाशील असून त्यांनी ‘पीबीआर’च्या कामात झोकून दिले आहे. पैंगीण येथील सर्पमित्रांना जैवविविधता मंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील नऊ पारंपरिक वैदूंना मंडळाचे मानांकन मिळाले आहे. त्यापैकी चार वैदूंना बंगळूर येथील संस्थेने त्यांची मुलाखत घेऊन त्यांना अंतिम मान्यताही दिली आहे.

काणकोणमधील स्थलांतरित कामगारांना कोरोना काळात काम नसल्याने कोणीच वाली नव्हता. त्यावेळी या कामगारांचे सर्व्हेक्षण करून काणकोण मामलेदारांच्या सहकार्याने त्यांना अन्नधान्य साठा पुरविण्याचे काम श्रीस्थळ समितीने केले.

शिवाय वेगवेगळ्या दात्यांच्या सहकार्याने सुमारे 11 हजार मास्क तयार करून त्याचा पुरवठा सरकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पायलट यांना विनामूल्य पुरवठा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com