Bhajan: पाल-सत्तरीत रंगली भजन संध्या मैफल

पाल-सत्तरी येथील श्री सातेरी महामाया मंदिरात भजन संध्या कार्यक्रम उत्साहात झाला.
Bhajan
Bhajan

Bhajan: पाल-सत्तरी येथील श्री सातेरी महामाया मंदिरात भजन संध्या कार्यक्रम उत्साहात झाला. पाल सत्तरीतील उदयोन्मुख संगीत गायक कलाकार रोहिदास गावकर यांच्या वार्षिक शुक्रवारनिमित्त गोव्यातील प्रतिभावंत भजनी कलाकारांनी भजने सादर केली.

सर्व भजनी कलाकारांना गुलाबपुष्प देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री सातेरी देवस्थान समितीचे अध्यक्ष साईनाथ गावकर, दशरथ गावकर, विठ्ठल गावकर, नवनाथ गावकर, गोपाळ गावकर, दशरथ गावकर, हरिश्चंद्र आयकर, स्थानिक भजनी कलाकार यशवंत आयकर, कृष्णा गावकर, दशरथ गावकर व देवस्थान पुजारी सुरेश गावकर उपस्थित होते.

यावेळी देवस्थान समिती प्रमुख साईनाथ गावकर व दशरथ गावकर यांची समयोचित भाषणे झाली.

पाल-सत्तरी येथील भजन मैफिलीत रोहिदास गावकर, विश्वंभर रासईकर, आतीश कारापूरकर, सर्वोदय मांद्रेकर, प्रमोद नाईक, प्रवीण नाईक, यशवंत आयकर, कृष्णा गावकर, सचिन गावकर, महादेव गावकर, जगदीश चोडणकर, भिवा गावकर यांनी एकाहून एक सरस असे अभंग सादर केले.

Bhajan
Sattari: सत्तरीत दशावतारी नाटकांना पसंती..!

त्यांना संवादिनी साथ रघुनाथ नाईक, विजय सावंत, आतीश कारापूरकर यांनी तर तबलासाथ संघर्ष पालेकर, पखवाज रजत तिरोडकर, निरज गावडे, ऋषिकेश यादव उसगावकर यांनी केली. ध्वनी संयोजन इजाज शेख यांनी तर छायांकन विशाल सावंत यांनी केले. भजन संध्या ऐकण्यास पंचक्रोशीतील भजनप्रेमी उपस्थित होते. विजय सावंत यांनी आभार मानले.

आपण वयाच्या आठव्या वर्षी अभंग सादर केला, तेव्हापासून आपल्याला भजन व संगीत कलेची आवड निर्माण झाली. गावातील पारंपरिक भजनी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी युवावर्गाने संगीत क्षेत्रात येऊन ही कला अबाधित ठेवावी. -रोहिदास गावकर, भजन गायक कलाकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com