P. S. Sridharan Pillai: केरळमध्ये राज्यपालांच्या ताफ्यात कार घुसवली

P. S. Sridharan Pillai: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई केरळच्या दौऱ्यावर असताना रविवारी रात्री त्यांच्या ताफ्यात केरळमधील कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाने आपली कार घुसवली.
Goa Governor p. s. sreedharan pillai
Goa Governor p. s. sreedharan pillaiDainik Gomantak
Published on
Updated on

P. S. Sridharan Pillai: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई केरळच्या दौऱ्यावर असताना रविवारी रात्री त्यांच्या ताफ्यात केरळमधील कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाने आपली कार घुसवली. त्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षितेचा प्रश्न काही वेळ निर्माण झाला होता.

याप्रकरणी केरळ पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल राजभवनाने मागविला आहे. त्या तरुणाला पोलिसांनी वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी केवळ १ हजार रुपये दंड आकारून सोडून दिल्याने आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केरळमधील भाजपने या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.

कोझिकोड येथील मावून रस्त्यावर हा प्रकार घडला. ज्युलियस निकीता या स्थानिक कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाने राज्यपालांच्या ताफ्तात आपली कार घुसवली.

Goa Governor p. s. sreedharan pillai
PM Narendra Modi: शैक्षणिक, पर्यटन हबची ‘गॅरंटी’!

त्याची कार राज्यपालांच्या कारशी काहीवेळ समांतर चालली होती. आझाकोडी मंदिर परिसरात हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी गर्दी केली होती.

पोलिसांनी कार चालकास नजिकच्या पोलिस ठाण्यात नेले. तेथे १ हजार रुपयांच्या दंडावर त्याची सुटका करण्‍यात आली. राज्यपालांनी गोव्यात परतल्यानंतर या विषयी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. अतिमहनीय व्यक्तींच्या ताफ्यात अवैधपणे प्रवेश करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यानुसार केरळ पोलिसांनी कोणती कारवाई केली, याची माहिती आता केरळ पोलिसांकडून राज भवनाच्या सचिवालयाने मागवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com