Goa Food Price Increase: ‘राईस प्लेट’ होणार महाग, इतरही पदार्थांचे दर वाढणार! काहींकडून अंमलबजावणी सुरु: व्यावसायिक सिलिंडर महागल्याने खिशाला ‘कात्री’

Commercial Gas Cylinder Price Hike: केंद्र सरकारने सिलिंडरच्या दरांत ९९३ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील काही हॉटेलांनी ‘राईस प्लेट’सह इतर खाद्यपदार्थांच्या दरांत शनिवारपासूनच वाढ केली.
Goa Food Price Increase
Goa Food Price IncreaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम असतानाच, केंद्र सरकारने सिलिंडरच्या दरांत ९९३ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील काही हॉटेलांनी ‘राईस प्लेट’सह इतर खाद्यपदार्थांच्या दरांत शनिवारपासूनच वाढ केली आहे. तर, इतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सोमवारपासून दरवाढ लागू करणार आहेत. परिणामी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

‘‘व्यावसायिक सिलिंडरच्या दरांत वाढ शुक्रवारपासून लागू झाली आहे. शनिवार आणि रविवारी आम्ही जुन्या दरानुसार ‘राईस प्लेट’ व इतर पदार्थ देणार आहोत. मात्र सोमवारपासून प्रत्येक पदार्थाच्या दरात दहा रुपयांनी वाढ केली जाईल,’’ असे पणजीतील प्रसिद्ध कॅफे भोसले रेस्टॉरंटचे मालक मिलिंद भोसले यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.‘व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अजूनही तुटवडा भासत आहे. त्यातच दरात सुमारे एक हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.

Goa Food Price Increase
Gas Cylinder Price Hike: महागाईचा चटका! गॅस सिलिंडर थेट 195.50 रुपयांनी महागला, नवे दर आजपासून लागू

येत्या काही दिवसांत ‘राईस प्लेट’सह इतर सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरांत किमान २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे महालक्ष्मी रेस्टॉरंटच्या मालकाने स्पष्ट केले. त्यांच्या शेजारील सरोवर हॉटेलमध्येही खाद्यपदार्थांच्या दरांत शनिवारपासूनच वाढ करण्यात आली आहे.

शाकाहारी थाळी आता १२० रुपये

शाकाहारी ग्राहकांच्या आवडीच्या या हॉटेलमध्ये पूर्वी ‘राईस प्लेट’ १०० रुपयांना मिळत होती. मात्र, शनिवारपासून त्यात २० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच नाश्त्याच्या पदार्थांमध्ये १० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्याने दिली.

Goa Food Price Increase
Commercial LPG Price Hike: राज्यातील हॉटेल उद्योगाचं मोडलं कंबरडं! सिलिंडर दरवाढीनं हिरावला तोंडचा घास; भाडे, वेतन आणि बिलांच्या खर्चात आता गॅसचीही भर

सरकारने सवलत देणे गरजेचे!

‘‘केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ केली असून, त्याचा फटका हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसणार आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढून त्याची झळ नागरिकांनाही बसणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या दरांत सवलत देणे गरजेचे होते,’’ असे रिट्स हॉटेलचे मालक दाद देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com