Commercial LPG Price Hike: राज्यातील हॉटेल उद्योगाचं मोडलं कंबरडं! सिलिंडर दरवाढीनं हिरावला तोंडचा घास; भाडे, वेतन आणि बिलांच्या खर्चात आता गॅसचीही भर

Goa Hotel Industry Crisis: सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ केल्याने लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
Commercial LPG Price Hike
Goa Hotel Industry CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ केल्याने लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. ‘अशा परिस्थितीत आम्ही हॉटेल व्यवसाय चालवायचे तरी कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भाड्याने जागा घेऊन व्यवसाय चालवावा लागतो, कामगारांचे वेतन, वीज-पाणी बिल, कच्चा माल यांचा खर्च करावा लागतो. एवढ्या खर्चानंतरही रोजची कमाई फारशी राहत नाही. त्यातच एवढी मोठी दरवाढ झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याची प्रतिक्रिया पणजीतील काही हॉटेल व्यावसायिकांनी दिली. हॉटेल व्यावसायिक उदय शिरोडकर म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही पदार्थांचे दर वाढवतो, तेव्हा ग्राहक कमी होतात. त्यामुळे व्यवसायाचे संपूर्ण गणित बिघडते. ही दरवाढ म्हणजे लहान व्यापाऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचाप्रयत्न आहे.

Commercial LPG Price Hike
LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा 'काळाबाजार' उघडकीस! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत

शहरात सिलेंडरशिवाय व्यवसाय करणे अशक्य असल्याचे ‘चायपानी’ स्टॉलचे चालक शशिकांत जाधव यांनी सांगितले. सध्या पाणी व विजेच्या दरातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरचे दर वाढल्यास आम्हाला नाईलाजाने पदार्थांचे दर वाढवावे लागतील. ही वाढ तात्पुरती असेल, तर काही प्रमाणात व्यवस्थापन करता येईल; मात्र दर कायम असेच राहिल्यास मोठी अडचण निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com