Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Job Scam Robbery: कोळवाळ परिसरात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 18 वर्षीय तरुणाची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Goa Job Scam
Goa Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

कोळवाळ परिसरात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 18 वर्षीय तरुणाची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला विश्वासात घेऊन निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता मोबाईल पेमेंट अॅपच्या माध्यमातून त्याच्याकडून 9,500 ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतल्याचा आरोप आहे.

मारहाण करून लुटले

प्राथमिक माहितीनुसार, नोकरीच्या संधीचे आमिष दाखवून आरोपींनी पीडित तरुणाला कोळवाळमधील एका एकांत ठिकाणी बोलावले. तेथे त्याला धमकावत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सुमारे 18,000 किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून मोबाईलद्वारे 9,500 आरोपींच्या खात्यात पाठवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई

या प्रकरणाची माहिती मिळताच कोळवाळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईलही जप्त केला आहे.

Goa Job Scam
Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

या गुन्ह्यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास मोहीम सुरू असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Goa Job Scam
Goa ST Community Development Fund: एसटींच्या प्रश्नाला उत्तर द्या! 3200 कोटींचा निधी का पोहोचला नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारला थेट सवाल

नोकरीच्या आमिषाने फसवणूक आणि लूटमार करण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः सोशल मीडिया किंवा फोनद्वारे मिळणाऱ्या नोकरीच्या ऑफरची खातरजमा केल्यानंतरच पुढील पावले उचलावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com