Colva: कोलव्यातील दुकानदारांचे तात्पुरते स्थलांतर! पर्यटनमंत्री खंवटेंचे आश्वासन; पहिल्या टप्प्यात विविध सुविधांचा समावेश

Rohan Khaunte: खंवटे यांनी कोलवा किनाऱ्यावरील दुकानदारांना आश्वासन दिले की, स्वदेश दर्शन २.० प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू असताना त्यांना तात्पुरत्या खास आखलेल्या जागांवर स्थलांतरित केले जाईल.
Rohan Khaunte, Goa Tourism
Rohan Khaunte, Goa Tourism Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कोलवा किनाऱ्यावरील दुकानदारांना आश्वासन दिले की, स्वदेश दर्शन २.० प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू असताना त्यांना तात्पुरत्या खास आखलेल्या जागांवर स्थलांतरित केले जाईल. खंवटे यांनी पुनर्विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी दुकान मालकांसोबत नुकतीच बैठक घेतली.

नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले, की सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने कोलवासाठी एक व्यापक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. गैरसोय कमी करण्यासाठी, दुकानदार बांधकाम पूर्ण होईपर्यंत विशेष आखणी केलेल्या कंटेनरमधून काम करतील, असे ते म्हणाले.

कोलवा हे दक्षिण गोव्यातील सर्वांत लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे, जे देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते. तथापि खंवटे यांनी सांगितले की, सध्याची रचना शॉपिंग एरियासह जीर्ण अवस्थेत आहे आणि त्वरित पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे.

Rohan Khaunte, Goa Tourism
Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

सरकार स्थानिक घटकांचे हित जपून कोलवाला चांगल्या पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधा देण्यास वचनबद्ध आहे. स्थलांतर हे तात्पुरते पाऊल आहे आणि पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर पर्यटक आणि दुकानमालक दोघांनाही मदत होईल, अशा पद्धतीने सुविधा सुधारल्या जातील, असे खंवटे यांनी सांगितले.

Rohan Khaunte, Goa Tourism
Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, पर्यटन उपसंचालक दीक्षा तारी, कोलवा पंचायतीचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी यांनी बैठकीला उपस्थिती लावली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आगमन मार्गावर पदपूल, शॉपिंग आणि फूड प्लाझाची पुनर्बांधणी, सीसीटीव्ही सुविधांसह पर्यटनस्थळ ब्लॉक, सुधारित चिन्हे आणि रस्त्यावरील इतर सुविधांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com