Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

Colva Road Tree Cutting : आज वृक्षप्रेमी कार्यकर्ते झरीना दा कुन्‍हा, किम मिरांडा आणि क्रायडन मेदेरा यांनी रस्‍त्‍यावर येऊन या प्रक़ाराला विरोध घेतला.
Colva Road Tree Cutting
Colva Road Tree Cutting Dainik Gomantak
Published on
Updated on

Colva Road Tree Cutting :

मडगाव, फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली मडगावच्‍या काेंब सब-वे रिंगरोड आणि कोलवा मार्गावरील मोठमोठ्या झाडांंची कंत्राटदाराकडून कत्तल करण्‍यात आली असून वृक्षप्रेमींनी त्‍याला हरकत घेतली आहे.

या कंत्राटदाराने झाडांवर दिवसा ढवळ्या घातलेला हा दराेडा आहे, असा आरोप त्‍यांनी केला.

आज वृक्षप्रेमी कार्यकर्ते झरीना दा कुन्‍हा, किम मिरांडा आणि क्रायडन मेदेरा यांनी रस्‍त्‍यावर येऊन या प्रक़ाराला विरोध घेतला. यासंदर्भात माहिती देताना दा कुन्‍हा म्‍हणाल्‍या, पावसात रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेल्‍या झाडांच्‍या फांद्या तुटून कुठलाही अनर्थ होऊ नये यासाठी झाडांच्‍या फांद्या छाटण्‍याला परवानगी दिली होती.

Colva Road Tree Cutting
Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

मात्र कंत्राटदाराने त्‍याचा गैररित्‍या फायदा उठवित कित्‍येक वृक्ष कापून काढले आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्‍याची मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rah Veer Scheme Goa
Goa Parra Road
Goa Tree Plantation 18469 saplings planted
Congress Seva Dal road safety
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com