Colva: कोलवा किनाऱ्यावरील बालोद्यानाची दुरवस्था! धोकादायक विद्युत बोर्ड, मोडलेली खेळणी; स्थानिकांनी फिरवली पाठ

Colva Beach Garden: केंद्र सरकारच्या संदेश दर्शन योजनेंतर्गत ११ कोटी रुपये खर्चून कोलवा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण केले होते.
Colva Beach Garden Poor Condition
Colva Beach Garden Poor ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: केंद्र सरकारच्या संदेश दर्शन योजनेंतर्गत ११ कोटी रुपये खर्चून कोलवा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण केले होते. लहान मुलांसाठी बालोद्यान हा त्याचाच एक भाग होता; पण आता हे बालोद्यान मृत्यूचा सापळा बनले आहे.

या बालोद्यानातील खेळणी मोडकळीस आली असून काही गंजली आहेत. त्यांची देखरेख व दुरुस्ती गेल्या कित्येक वर्षांपासून केलेली नाही, असे स्थानिक सायमन रॉड्रिग्स यांचे म्हणणे आहे.

येथील घसरगुंडी, झोपाळे मोडकळीस आले आहेत. घसरगुंडीच्या काही फळ्या उखडल्या आहेत. त्यामुळे एखादे मूल त्यावर बसले तर खाली पडून इजा होण्याची शक्यता असल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले.

Colva Beach Garden Poor Condition
Colva Beach: कोलवा किनारा आपलं वैभव हरवून बसला... वाढत्या प्रदूषणाला सरकारच जबाबदार; समाज सेवक सायमन रॉड्रिग्ज यांची टिका

या बालोद्यानात जे विजेचे खांब आहेत, त्याखालील वीज वाहिन्यांचे बोर्ड खुले आहेत. एखाद्या मुलाचा त्याला चुकून हात लागला तर अनर्थ होण्याची शक्यता आहे. येथील स्थिती माहीत असल्यामुळे स्थानिक लोक येथे फिरकत नाहीत; पण पर्यटकांची मुले अधूनमधून येथे येतात. संंबंधित खात्याने वेळीच याची दखल घेऊन या बालोद्यानाला नवी झळाळी द्यावी, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com