कुडचडेतील युवतीने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय
College student commits suicide at Curchorem
College student commits suicide at CurchoremDainik Gomantak
Published on
Updated on

केपे : केपे सरकारी महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या कुडचडे येथील कविता दळवी (19) या युवतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही युवती मूळ खानापूर येथील रहिवाशी आहे. या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुडचडे (curchorem) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ खानापूर येथील कविता दळवी यांचे कुटुंबीय कुडचडे येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.

College student commits suicide at Curchorem
..आणि गोव्यातील भाजपचे 'ते' पराभूत उमेदवार विजयी ठरले

आज संध्याकाळी तिचा मृतदेह पंख्याला लटकताना कुटुंबियांना दिसला. हे दृष्य पाहून आई-वडील भयभीत झाले. त्यांनी काही वेळातच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली घेतला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. युवतीने आत्महत्या (suicide) का केली? याचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तिच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास कुडचडे पोलीस (police) करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com