Borim: बोरी ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी! वाढीव घरपट्टी होणार कमी, ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव

Borim House Tax: बोरी कोमुनिदादने खाजोर्डाच्या डोंगर माथ्यावर कचरा शेड बांधण्यासाठी भूखंड दिला होता. त्या ठिकाणी कचरा शेड बांधण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.
Borim Panchayat Gramsabha
Borim Panchayat GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: बोरी गावातील नागरिकांची काही वर्षांपूर्वी वाढवलेली भरमसाट रकमेची घरपट्टी सर्वसामान्य नागरिकांना डोईजड झाली असून या घरपट्टीची रक्कम अर्धी करण्याचा ठराव आज बोरी पंचायतीच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला. ही ग्रामसभा सरपंच जयेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात घेण्यात आली.

या ग्रामसभेला उपसरपंच भावना नाईक, पंच सदस्य सागर नाईक बोरकर, सतीश नाईक, दुमिंग कॉस्ता वाझ, किरण नाईक, रश्‍मी नाईक, सुनील बोरकर, विनय बोरकर, संगीता गावडे, दत्तेश नाईक आदी उपस्थित होते. सरपंच जयेश नाईक यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत सचिव प्रसाद नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. त्याला ग्रामस्थांनी मान्यता दिल्यानंतर ग्रामसभेला प्रारंभ करण्यात आला.

बोरी पंचायत क्षेत्रात काही काळापूर्वी काँक्रिटचे छत असलेल्या घरांना चौपट रकमेने घरपट्टी बसवण्यात आली होती. मात्र, अनेकांना ही घरपट्टी भरणे कठीण होत होते. आता ही घरपट्टी अर्धी करण्याबरोबरच मातीच्या घरांना कमी घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी थकीत घरपट्टी अर्धी भरायचे ठरले.

Borim Panchayat Gramsabha
Borim Bridge: बोरी पुलाबाबत सुनावणी एप्रिलमध्ये! शेतकऱ्यांना जमीन संपादनाची भीती, कृतिसाठी घेणार बैठक

पावसाळ्यापूर्वी पंचायत क्षेत्रातील गटारे स्वच्छ करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. पावसाळ्यात केरकचरा साचून रस्त्यावरून पाणी वाहते, म्हणून मान्सूनपूर्व कामांवर भर देण्याबाबत ग्रामस्थांनी सूचवले. यावेळी वीज, पाणी रस्ते तसेच आरोग्य या विषयांवरही ग्रामसभेत चर्चा करून आवश्‍यक निर्णय घेण्यात आले.

Borim Panchayat Gramsabha
New Borim Bridge: नव्या बोरी पूलासाठी भूसंपादन; सरकारचे म्हणणे काय, शेतकरी नाराज का आहेत?

कचरा शेड बांधण्याचा ठराव

बोरी कोमुनिदादने खाजोर्डाच्या डोंगर माथ्यावर कचरा शेड बांधण्यासाठी भूखंड दिला होता. त्या ठिकाणी कचरा शेड बांधण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला. या ठिकाणी सुका आणि ओला कचरा यांचे वर्गीकरण करणारी यंत्रणा बसवण्याचे ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com