Coco Beach Fire: कोको बीचवर आगीचे तांडव! 5 होड्या आगीत खाक; जवळपास 50 लाखांचे नुकसान

Coco Beach Boat Fire: संजय कळंगुटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही येथे समारे २०० हून अधिक बोट मालक असून येथे किनारी भागात आपापल्या बोटी पार्क करून ठेवतात.
Coco Beach Boat Fire
Coco Beach Boat FireDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: नेरुल-बार्देश येथील कोको बीच येथे समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या पाच होड्यांना शुक्रवारी (ता.२) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आग लावली. होड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. येथील फायबर होड्या तसेच लाकडी होड्यांचा यात समावेश आहे.

या दुर्घटनेत होड्याचालकांचे सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. येथे बाजूला असलेल्या होड्यांच्या स्टोअर्स रुमलाही आग लागल्याने आतील सुमारे तीन लाखांच्या वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी येथील बोटमालक संघटनेने केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा तपासून संशयितास अटक करण्याची मागणी बोटमालक संघटनेचे अध्यक्ष संजय कळंगुटकर यांनी केली आहे.

संजय कळंगुटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही येथे समारे २०० हून अधिक बोट मालक असून येथे किनारी भागात आपापल्या बोटी पार्क करून ठेवतात. त्यात काही लाकडी तर काही फायबर बोटींचा समावेश आहे.

Coco Beach Boat Fire
Bicholim Fire Incident: डिचोली मार्केटमध्ये कपड्यांच्या शोरूमला आग, 3 लाखांहून अधिक मालमत्ता भस्मभात

काही होड्या दुरुस्ती करण्यासाठी किनाऱ्यावर काढून ठेवल्या जातात. यापूर्वी तीनवेळा कोको बीचवर होड्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या होत्या. येथील काही जागा कोमुनिदादच्या मालकीची असून या जागेच्या वादातून ही आग लावली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरा तपासून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कळंगुटकर यांनी केली आहे.

Coco Beach Boat Fire
Bicholim Tree Fire: 200हून अधिक वर्षांचा इतिहास, गावचे वैभव गेले जळून; डिचोली धुमाशेतील दुर्घटना, पहा Video

पिळर्ण अग्निशमनच्या बंबाचा वापर

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अचानक आगीचे लोळ बाहेर पडले व वाऱ्याबरोबर आगीने मोठा पेट घेतला. तेव्हा स्थानिकांनी पाण्याचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने मोठा पेट घेतली. त्यामुळे घटनेची माहिती पिळर्ण अग्निशामक दलाला देण्यात आल्यावर कर्मचारी व बंब अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दलाने घटनास्थळी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com