Coal Transportation: मुरगाव पालिका मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी हातगाडेधारकांकडून 3 ऐवजी 9 रुपये सोपो आकारण्याचा ठराव घेण्यात आला. शहर भागात सकाळी 7 ते रात्री 10 वा.
या वेळेत कोळसा वाहतुकीसह अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक माल, बांधकाम साहित्य आदी महत्त्वाच्या अवजड वाहनांना सूट देण्याचे ठरवण्यात आले.
कर्मचारी बढती, रद्द झालेली पदे, भूमिगत गॅसवाहिन्या, बॅनर्स लावण्यास बंदी, सोपो दरवाढ आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही महत्त्वाचे ठरावही घेण्यात आले. या बैठकीत 32 विषयांवर चर्चा होणार होती. तथापि सुमारे 17 विषयांवर चर्चा झाल्यावर बैठक तहकूब करण्यात आली.
पालिकेची विभागीय बढती समिती नसल्याने कामगारांना बढती मिळण्यास अडचणी येत आहेत. कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे सुमारे 20 पदे रद्द झाली आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. कामगारांना वेळेवर बढती मिळेल याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज नगरसेवक दीपक नाईक यांनी व्यक्त केली.
भूमिगत गॅसवाहिन्या घालण्याचे काम सध्या बंद ठेवावे. संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी आपत्कालीन व्यवस्थापन संबंधीची माहिती, आराखडा इत्यादीचे सादरीकरण करावे. त्यानंतर काम सुरू करावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
वाहिन्यांमार्फत कुकिंग गॅस पुरवठा होणार, ही चांगली गोष्ट आहे. तथापि त्या वाहिन्या घालण्यापूर्वी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे, हे नागरिकांना समजणे महत्त्वाचे आहे.
बॅनर्ससाठी जागा शोधावी
पालिका क्षेत्रात पालिकेची परवानगी घेतल्याशिवाय कुठेही बॅनर्स लावण्यास बंदी आहे. पालिकेची परवानगी आधी घ्यावी. भविष्यात डिजिटल जाहिरात करण्यात येईल. त्यासाठी फिरती व्हॅन किंवा एक जागा निश्चित केली जाणार आहे. तोपर्यंत टू बाय टूचे बॅनर्स लावण्यासाठी दोन-तीन जागा शोधाव्यात. तेथे सर्व सोपस्कार करून बॅनर्स लावावेत, असे ठरले.
सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मनाई
याप्रसंगी सडा भागातील नगरसेवक दामोदर कासकर यांनी सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सडा भागातून कोळसा वाहतूक होत असल्याने प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
मुरगाव बंदर ते सडा, बायणा उड्डाण पूल, वरुणपुरी येथून सकाळी 7 ते रात्री 10 वा. या वेळेतील कोळसा वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.