Goa Crime: महिला अत्याचारांवर बसणार आळा; नराधमांची नांगी ठेचणार गोवा महिला पोलिस

CM Sawant on Crime against women: महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पिंक फोर्स आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली.
CM Sawant on Crime against women: महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पिंक फोर्स आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली.
Goa Police on Crime against women Dainik Gomantak
Published on
Updated on

Crime against women in Goa

पणजी: गोव्यातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी ( दि. ३ ऑक्टोबर ) रोजी पणजीत पिंक फोर्स आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली.

राज्यात महिलांविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांवर कशाप्रकारे आळा बसवता येईल यावर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील महिला सुरक्षित असाव्यात किंबहुना महिलांना राज्यात वावरताना सुरक्षित वाटावे म्हणून शाळा, कॉलेज आणि पंचायतींमध्ये जाऊन याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मते महिलांवर होणारे अत्याचार प्रकाशात तर येतात मात्र त्यावर कायमचा निर्बंध लावणं महत्वाचं आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा बसवण्यासाठी स्वतः महिलांनी उपाय सुचवणं महत्वाचं होतं आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत पिंक फोर्स तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांवर होणारे अत्याचार कोणते आणि ते कसे रोखले जाऊ शकतात यावर उत्तम कल्पना सुचवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

CM Sawant on Crime against women: महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पिंक फोर्स आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली.
CM Pramod Sawant: 'माझंही शिक्षण...'; मराठीला अभिजात दर्जा मिळताच मुख्यमंत्री सावंतांकडून आनंद साजरा

राज्यातील महिला एसपीनी एकत्र येऊन एक ट्रेनिंग मॉडेल तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, आणि येत्या महिन्या दीड महिन्यात यावर काम सुरु होईल. नवरात्रीच्या दिवशी महिलांनी एकत्र येत स्त्रियांसाठी काम करणं ही अभिमानाची गोष्ट आहे असे म्हणत मुख्यमंत्रीनी सर्वांचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com