Goa Budget Session 2023 : ‘खाजन शेती करणाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावेत’

मुख्यमंत्र्यांचे आवाहन; सरकार प्रतिचौरस मीटर 80 रुपये खर्च देण्यास तयार
Goa Budget 2023-24
Goa Budget 2023-24Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील 18 हजार हेक्टर खाजन शेतीचे संरक्षण करण्याचे काम सरकार निश्चित करीत आहे. खाजन बांध बाधण्यासाठी व संरक्षणासाठी राज्य सरकारने 178.98 कोटी रुपये खर्च केले आहेत. नव्याने 64 बांधांची बांधणी केली गेली आहे.

खाजन बांधाची जबाबदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, त्यासाठी सरकार प्रतिचौरस मीटर 80 रुपये खर्च देण्यास तयार आहे. खाजन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज क्षेत्रिय कृषी अधिकाऱ्यांकडे चार महिन्यांत सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Goa Budget 2023-24
Goa Online Portal : ‘गोवा ऑनलाईन पोर्टलसाठी आता भरावे लागणार पैसे’

याबाबत खाजन शेतीविषयी आमदार विरेश बोरकर यांनी मांडलेला खासगी ठराव चर्चेअंती मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य मुक्तीपूर्वी खाजन शेती पूर्वजांनी सांभाळली. परंतु 1961 नंतर खाजन शेतीची स्थिती बिघडली.

खाजन शेती संरक्षणासाठी राज्यभरात 500 बांध आहेत. नव्याने 64 बांध बांधले आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेनुसार खाजन शेती संरक्षणासाठी केंद्राकडून 75:25 असा खर्च दिला जातो.

आतापर्यंत केंद्राकडून 138.98 कोटी रुपये मिळाले आहेत. खाजन शेती संरक्षणाची जबाबदारी शेतकऱ्यांची आणि शेतकरी सोसायटींची आहे. आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले, केंद्र सरकार खाजन शेती राखण्यासाठी निधीही देते. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे खाजन शेतीबाबत निश्चित माहिती गोळा करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Work From Home Goa Viral Video
Goa Government Spending
Rock Mascarenhas GIDC spending
Parul Gulati Goa Villa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com