Goa News: डिचोली केंद्रशाळेचे आज उद्‍घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या नवीन इमारत प्रकल्पाचे उद्‍घाटन होणार आहे.
Goa News |School
Goa News |SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: विद्यार्थी, पालकांसह समस्त डिचोलीवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या सरकारी केंद्रशाळेच्या नवीन इमारतीच्या उद्‍घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वा. आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या नवीन इमारत प्रकल्पाचे उद्‍घाटन होणार आहे.

या सोहळ्याला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष आमदार केदार नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवीन इमारत प्रकल्प उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत होता. या इमारतीत कधीपासून शाळेचे वर्ग भरतात, त्याची पालकांनाही प्रतीक्षा लागून राहिली होती.

काम पाच वर्षे रेंगाळले

मोठा इतिहास असलेल्या आणि केंद्रशाळा म्हणून परिचित असलेल्या डिचोलीतील सरकारी शाळेसाठी पूर्वीच्याच जागेत जवळपास 16 कोटी रुपये खर्च करून सर्व साधनसुविधांनीयुक्त अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Goa News |School
Goa Agriculture: म्हावळींगेत पठाराला आग; काजूची झाडे भस्मसात

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर एप्रिल 2019 मध्ये भूमिपूजन करून या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यात आली.

मध्यंतरी ''कोविड'' महामारी आणि अन्य कारणांवरून या इमारतीचे काम रेंगाळत गेले. चालू शैक्षणिक वर्षारंभीच नवीन इमारतीचे उद्घाटन करणे अशक्य झाल्यानंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पात शाळेचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

परंतु ऑगस्ट महिन्यातही अंतिम टप्प्यातील काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडले होते.

Goa News |School
Goa News: पुस्तकांच्या दुनियेत रमणारे चालतेबोलते ग्रंथालय

छत्रपती शिवरायांचे नाव

सुरुवातीच्या काळात तांबडी शाळा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या केंद्रशाळेला मोठा इतिहास आहे. यापुढे ही शाळा छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुल या नावाने ओळखण्यात येणार आहे.

डिचोली ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असा इतिहास आहे. त्यामुळे नवीन शाळा प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com