Bhutani Infra: ..चुका करणाऱ्यांची गय नाही; ‘भूतानी’वरुन मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

Bhutani Project: सांकवाळ येथे सध्या वादग्रस्त ठरलेल्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्तीशः लक्ष घातले आहे
Bhutani Project: सांकवाळ येथे सध्या वादग्रस्त ठरलेल्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्तीशः लक्ष घातले आहे
CM Pramod Sawant|Bhutani InfraDainik Gomantak
Published on
Updated on

Bhutani Infra Project Sancoale

पणजी: सांकवाळ येथे सध्या वादग्रस्त ठरलेल्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्तीशः लक्ष घातले आहे. या प्रकल्पाला कोणी, कधी, कोणत्या परवानग्या दिल्या, त्यात कोणत्या त्रुटी होत्या याची माहिती देणारा अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी संबंधित खात्यांना केली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर मेहेरनजर दाखवणारी सरकारी यंत्रणा हादरली आहे. या प्रकरणात चुका केलेल्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे सरकारी यंत्रणेकडे या साऱ्याचा अहवाल मागितला असला तरी समांतर पद्धतीनेही त्यांनी माहिती गोळा करणे सुरू केल्याने त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे निश्चित केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे माहिती हक्‍क कार्यकर्ते नारायण नाईक यांनी उपरोक्‍त प्रकरणात पंचायत खात्‍याला जबाबदार धरले आहे. यासंदर्भात पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याप्रश्‍नी गोवा बचाव अभियानने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट मागितली आहे.

पंचायत खात्‍याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष

वॉलीस या ग्रामसेवकाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘परमेश कन्ट्रक्शन’ने आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नाहीत. चार पंचांनी आक्षेप घेऊनही तत्कालीन सरपंच गिरीश पिल्ले यांनी परवाना देण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांच्याकडे तक्रार केली. गटविकास अधिकारी इम्यॅनुएल डिकॉस्ता यांनी चौकशी केली; पण परवाना मागे घेतला नाही. त्यामुळे कोर्टात दाद मागावी लागली, असे नारायण नाईक म्हणाले.

Bhutani Project: सांकवाळ येथे सध्या वादग्रस्त ठरलेल्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्तीशः लक्ष घातले आहे
Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

या प्रश्‍नांची उत्तरे शोधणार!

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी यंत्रणा जुंपली आहे.

जमीन व्यवहारात खोट आहे का?

प्रकल्प साकारणाऱ्यांनी कोणाच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे का?

नगरनियोजन खात्याला चुकीची माहिती दिली आहे का?

पंचायतीने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवाना जारी केला आहे?

या साऱ्या प्रश्‍नांची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी एका विश्वासू अधिकाऱ्यावर सोपविली आहे.

पंचायत पातळीवर बेकायदेशीरपणे बांधकाम परवाना दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. माझ्याकडे थेट कोणी तक्रार केली तर त्याविषयीचे चौकशीचे आदेश मी लगेच जारी करेन.

संजय गोयल, राज्य सरकारचे सचिव (पंचायत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com