
पणजी: समाजसेवा करताना मी राजकारण करत नाही. कारण हे कार्य गोव्यातील लोकांसाठी आहे. मात्र, भाजप वगळता काही विरोधक मात्र काम करताना राजकारण करतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भाजप मंडळ निवडणूक होऊन मंडळ अध्यक्ष निवडल्यानंतर लगेच जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका देखील घेण्यात आल्या.
भाजप मंडळ निवडणूक होऊन मंडळ अध्यक्ष निवडल्यानंतर लगेच जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका देखील घेण्यात आल्या. शुक्रवारी निवडणूक झाल्यानंतर उत्तर गोव्यातील जिल्हाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी (११ जानेवारी) दयानंद कारबोरकर यांचे नाव घोषित केले. यावेळी ते बोलत होते.
भाजप संघटनात्मक कामात युवकांना सहभागी करून घेण्यावर भर देत असले तरी काही ज्येष्ठ नेत्यांचीही पक्षाला गरज आहे. त्यामुळे ज्येष्ठांची पक्षात उच्च पदांवर नेमणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले की, भाजप हा लोकशाहीवर आधारित पक्ष आहे. आम्ही उत्तर गोव्यात २० मतदारसंघांमध्ये निवडणुका घेतल्या आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत भाजप कार्यकत्यांचे योगदान आणि ताकद महत्त्वाची आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप सरकार अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्त्वांवर काम करत आहे. हे तत्त्व पुढे नेताना पक्षासाठी काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळते. सध्या ४ लाख २५ हजार लोक भाजपचे सदस्य झाले असून, त्यांचा पक्षाच्या भवितव्यासाठी उपयोग होणार आहे. २०२७ सालच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेत पक्षाला सूचना द्याव्यात. जिल्हा व मंडळ पातळीवर नवीन टीम तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, नवे प्रदेशाध्यक्ष निश्चित झाल्यानंतर मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था जगात तिसन्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत ती दुसन्या क्रमांकावर पोहोचेल. हे साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले, युवक मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, राजकारण हे दुय्यम आहे. देशाच्या विकासालाच आमचे प्राधान्य आहे. भाजपचे कार्यकर्ते निःस्वार्थपणे व योग्य पद्धतीने काम करतात. २०४७ पर्यंतच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.